Aryan Khan bail hearing : आर्यन खानच्‍या जामीन अर्जावर आज उच्‍च न्‍यायालयात सुनावणी | पुढारी

Aryan Khan bail hearing : आर्यन खानच्‍या जामीन अर्जावर आज उच्‍च न्‍यायालयात सुनावणी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्‍या जामीन अर्जावर ( Aryan Khan bail hearing :) आज मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. 20 ऑक्‍टोबर रोजी मुंबई सत्र न्‍यायालयाने त्‍याचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच त्‍याच्‍या न्‍यायालयीन कोठडीत ३० ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली होती. यानंतर त्‍याच्‍या वकिलांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात दाद मागितली होती.

( Aryan Khan bail hearing :) एनसीबी आजही करणार जामीनास विराेध

( Aryan Khan bail hearing :) आर्यन खानच्‍या जामीन अर्जावरील सुनावणी व्‍हिडिओ कॉन्‍फरसिंगच्‍या माध्‍यमातून व्‍हावी, अशी मागणी आम्‍ही केली होती. मात्र न्‍यायाधीशांनी यास नकार दिला, अशी माहिती आर्यन खानच्‍या वकिलांनी दिली. आजच्‍या सुनावणीत नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरोकडून (एनसीबी) आर्यन खान व अन्‍य संशयित आरोपींच्‍या जामीनास विरोध करण्‍यात येईल, असे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे. मागील तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ आर्यन खान कारागृहात आहे. २१ ऑक्‍टोबर रोजी शाहरुख खान याने मुंबईतील आर्थर रोड कारागृहात जावून आर्यन खानची भेट घेतली होती.

२ ऑक्‍टोबर रोजी एनसीबीने मुंबईतील अलिशान क्रुझ रेव्‍ह पार्टीवर छापा टाकला होता. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंटसह सहा जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली ही कारवाई करण्‍यात आली होती. या कारवाईवेळी १३ ग्राम कोकीन, ५ ग्राम एमडी, २१ ग्राम चरस, ‘एमडीएमए’च्‍या २२ गोळ्या तसेच एक लाख ३३ हजार रुपयांची रोकड जप्‍त केली होती. या कारवाईवेळी आर्यन खान याच्‍याकडे ड्रग्‍ज सापडले नव्‍हते, असे एनसीबीने स्‍पष्‍ट केले होते.

याप्रकरणी आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्‍यात आली. यामध्‍ये दोन युवतींचाही समावेश आहे. न्‍यायालयांनी सर्व संशयित आरोपींना न्‍यायालयीन कोठडी सुनावल्‍यानंतर सर्वांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्‍यात आली होती. याप्रकरणाचा एनसीबी अद्‍याप तपास करत आहे. आर्यन खानने केलेल्‍या व्‍हॉटस ॲप चॅटिंगवरुन अभिनेत्री अनन्‍या पांडे हिचीही दोनवेळा चौकशी करण्‍यात आली आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button