ड्रग्ज केस : नवाब मलिक आणखी एक गौफ्यस्फोट करणार?

ड्रग्ज केस : नवाब मलिक आणखी एक गौफ्यस्फोट करणार?
Published on
Updated on

मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. नवाब मलिक यांनी नवीन एक ट्विट करत एका गोष्टीचा खुलासा केला आहे. एका अनोळखी NCB अधिकाऱ्याकडून मला मिळालेल्या पत्राचा लिफाफा. त्यातील मजकूर मी लवकरच ट्विटरवर प्रसिद्ध करणार आहे, असे नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटरवर लिहिले की, "शुभ प्रभात सर्वांना, मी लवकरच रिलीज करत आहे… 'स्पेशल 26′". त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री मलिक यांना एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून मिळालेल्या पत्राचा तपशील जाहीर करणार आहेत.

समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यात मुंबईतील ड्रग्ज-ऑन-क्रूझच्या चौकशीवरून मतभेद सुरु आहेत. काल समीर दाऊद वानखेडे इथून फसवणूक सुरू झाली असे म्हणत मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर शेअर केला आहे. यानंतर वानखेडे यांनी मलिक यांच्याशी कायदेशीर लढा देणार असल्याचे सांगितले.

मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीच्या मुंबई विभागीय पथकाने 2 ऑक्टोबर रोजी छापेमारी करून ड्रग्ज पार्टी करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 14 जणांना ताब्यात घेतले. चौकशीअंती सहा जणांना सोडून देत एनसीबीने आर्यनसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा अशा आठ जणांना अटक केली. 2 ऑक्टोबरच्या दुपारपासून दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत या नाट्यमय घडामोडी घडल्या. या कारवाईसाठी एनसीबीने एकूण 9 पंचांची मदत घेतली. यातील साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याने एक प्रतिज्ञापत्र दाखल करून अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत.

नवाब मलिकांकडून सुरु असलेल्या आरोपांवरून समीर वानखेडे यांनी खुलासा केला होता, पण प्रभाकर साईल यांच्या व्हिडिओनंतर त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत होत असलेल्या आरोपांवर न्यायालयात माहिती दिली. या कारवाईवरून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरून केसवर परिणाम होऊ नये, म्हणून एनसीबीने न्यायालयात भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news