Social media : सोशल मीडिया 30 मिनिटेच वापरा, बेचैनी टाळा! | पुढारी

Social media : सोशल मीडिया 30 मिनिटेच वापरा, बेचैनी टाळा!

नवी दिल्ली, जाल खंबाटा : महाविद्यालयांचे जे विद्यार्थी दिवसभरात सोशल मीडियाचा वापर 30 मिनिटांपेक्षा कमी करतात, अशा विद्यार्थ्यांमध्ये बेचैनी, नैराश्य, एकाकीपणा व सतत कशाची तरी भीती असण्याची शक्यता खूपच कमी असते, असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे. मागील महिन्यात अमेरिकन मानसोपचार संघटना व अमेरिकन सर्जन जनरल यांनी आरोग्यविषयक काही निर्देश जारी केले होते.

9 ते 19 या वयोगटातील अल्पवयीन आणि पालकांविषयी त्यांनी काही चिंता व्यक्त केल्या आणि काही उपाय देखील सूचवले. या अहवालात असे स्पष्टपणे नमूद केले गेले आहे की, युवा वर्गात सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक आहे आणि याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड विपरीत परिणाम होत आहे.

ज्या विद्यार्थ्यांना सोशल मीडिया वापराबाबत ऑटोमेटेड रिमाईंडर मिळतात, ते याबाबत अधिक जागरूक असल्याचे दिसून येते, असे निरीक्षण या संशोधन अहवालात नोंदवले गेले आहे.

जे विद्यार्थी सोशल मीडिया कमी वापरतात, त्यांना केवळ एकाच परिमाणात नव्हे तर अनेक परिमाणात याचे लाभ होतात, इतरांच्या तुलनेत ते अधिक स्वस्थ राहतात, असे निरीक्षण लोवा विद्यापीठातील ह्यूमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन पीएचडी संशोधक इला फॉलबरने नोंदवले. रोज केवळ रिमायंडरमुळे सोशल मीडियापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते, अशा लोकांवर मी विशेष प्रभावित आहे. स्वत:वर बंधने घालणे आणि 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ सोशल मीडियाला द्यायचा नाही, हे स्वत:ला ठणकावून सांगणे, हे दोन रामबाण उपाय ठरु शकतात, असे ती पुढे म्हणते.

Back to top button