Twitter New Feature : ट्विटरवर लवकरच व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करता येणार फीचर; मस्क यांनी केली घोषणा | पुढारी

Twitter New Feature : ट्विटरवर लवकरच व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करता येणार फीचर; मस्क यांनी केली घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क :   सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर आता लवकरच व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग फीचर येणार आहे. याबाबत ट्विटरचे (Twitter) मालकी हक्क मिळाल्यापासून ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत सांगितलं आहे. (Twitter New Feature)

Twitter New Feature : कोणाशीही व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट

 ट्विटरची (Twitter) मालकी हक्क मिळाल्यापासून ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्विटरवर अनेक प्रयोग करत असतात. अशातच आता इलॉन मस्क यांनी आणखी एक ट्विट करत ट्विटरच्या नव्या फिचर बद्दल सांगितलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की,”ट्विटरच्या नव्या नवीनतम आवृत्तीसह, युजर थ्रेडमधील कोणत्याही मेसेजला DM (Direct massage) करू शकता. त्याचबरोबर कोणतीही इमोजी प्रतिक्रिया देऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या ट्विटर हँडलवरून जगभरातील कोणाशीही व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट करु शकणार आहेत. आणि संवाद साधता येणार आहे. विचारांची देवाण-घेवाण करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट करत असताना तुम्हाला समोरील व्यक्तीला  तुमचा संपर्क नंबर देण्याची गरज भासणार नाही.

हेही वाचा

Back to top button