China drafts new law : अल्‍पवयीन मुलांच्‍या गुन्‍ह्यांसाठी आता चीनमध्‍ये आई-वडिलांना होणार शिक्षा

China drafts new law : अल्‍पवयीन मुलांच्‍या गुन्‍ह्यांसाठी आता चीनमध्‍ये आई-वडिलांना होणार शिक्षा
Published on
Updated on

गंभीर गुन्‍हे करणार्‍या अल्‍पवयीन मुलांच्‍या आई-वडिलांनीही शिक्षा केली जाईल. तसेच कुटुंब शिक्षण कार्यक्रमात त्‍यांना सहभागी व्‍हावे लागेल, अशा स्‍वरुपाचा कायदा ( China drafts new law ) लवकरच चीन करणार आहे. मुलांच्‍या विश्रांती आणि खेळण्‍याच्‍या वेळाही ठरविण्‍याबाबत विचार सुरु असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

कुटुंब शिक्षण संवर्धन कायद्‍यामध्‍ये ( China drafts new law ) लवकरच चीन बदल करणार आहे. नवीन कायद्‍यानुसार आता गंभीर गुन्‍हे करणार्‍या मुलांच्‍या आई-वडिलांनाच सार्वजनिकरित्‍या सुनावले जाईल. तसेच त्‍यांना कुटुंब शिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे सक्‍तीचे असेल. या कार्यक्रमात त्‍यांना मुलांची काळजी कशी घ्‍यावी, ज्‍या मुलांचे वर्तन बिघडले आहेत त्‍यांच्‍यामध्‍ये सुधारणा कशी करावी, यासंदर्भातील मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.

नॅशनल पीपुल्‍स काँग्रेसच्‍या विधी आयोगाचे प्रवक्‍ता जँग ताइऐ यांनी यासंदर्भात सांगितले की, अल्‍पवयीन मुलाने गंभीर गुन्‍हा करण्या‍मागे अनेक कारणे असतात. कुटुंबात व्‍यावहारिक शिक्षणाचा अभाव हे याचे एक मुख्‍य कारण असू शकते. त्‍यामुळे आम्‍ही कायद्‍यामध्‍ये बदल करणार आहोत. सध्‍या चीन संसदेच्‍या स्‍थायी समिती या कायद्‍याची समीक्षा करीत आहे. या समितीने मंजुरी दिल्‍यानंतर याचे कायद्‍यात रुपांतर होईल, असेही त्‍यांनी सांगितले.

नवीन नियमावलीमध्‍ये आई-वडिलांनी मुलांची विश्रांती, खेळ आणि व्‍यायाम याच्‍या वेळा निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. तसेच अल्‍पवयीन मुले व्‍यसनापासून लांब रहावीत , ऑनलाईन गेमपासून त्‍यांना परावृत्त करावे यासाठीही सरकारकडून उपाययोजना केल्‍या जात आहेत.

( China drafts new law )  इंटरनेट गेमिंगच्‍या तासांमध्‍येही घट

चीनमधील शिक्षण मंत्रालयाने आता इंटरनेट गेमिंगवर चाप आणण्‍याचा निर्धार केला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्‍येकी एक तासच इंटरनेट गेमिंगची परवानगी देण्‍यात आली आहे. अल्‍पवयीन मुलांवर सेलिब्रिटीचा असणारा प्रभावही कमी करण्‍यासाठीही हालचाली सुरु झाल्‍या आहेत.

मुलांना विश्रांती आणि खेळ यासाठी वेळ मिळावा म्‍हणून त्‍यांचा गृहपाठही कमी करण्‍याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच शाळा झाल्‍यानंतर अतिरिक्‍त तासांनाही विरोध करण्‍यात आला आहे. आठवड्याच्‍या शेवट प्रमुख विषय शिकवले जावेत. एकुणच मुलांचे मानसिक स्‍वास्‍थ चांगले राहावे त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्‍वाचा सर्वांगीण विकास व्‍हावा, यासाठी चीन सरकार नवीन नियमांची अंमलबजावणी करीत आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news