बर्ड फ्लूचा संसर्ग सागरी जीवांनाही होऊ शकतो | पुढारी

बर्ड फ्लूचा संसर्ग सागरी जीवांनाही होऊ शकतो

लंडन : ‘बर्ड फ्लूचा संसर्ग याचे अत्यंत दुर्मीळ उदाहरण समोर आले आहे. या आजाराच्या संसर्गाने काही सागरी जीवांचा मृत्यू झाला. इंग्लंडमधील ‘वाईल्डलाईफ रिहॅबिलिटेशन सेंटरम’धील पाच हंस, पाच सील मासे आणि एका कोल्ह्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जगातील शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत व बुचकळ्यात पडले आहेत. खरोखरच हा आजार जर समुद्री जीवांमध्ये पसरला तर एखादे फारच गंभीर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसे पाहिल्यास वरील जीवांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग 2020 च्या अखेरच्या महिन्यात पसरला होता. मात्र, अद्याप याचा खुलासा करण्यात आला नव्हता. कारण एक तर यावर शास्त्रज्ञ संशोधन करत होते. याबरोबरच त्यांना कोरोना महामारीमुळे हतबल झालेल्या जगाच्या मनात नव्या भीतीची भर घालावयाची नव्हती.

तसे पाहिल्यास सस्तनधारी जीवांना सहजासहजी बर्ड फ्लूचा संसर्ग होत नाही. मात्र, इंग्लंडमधील या घटतेन पाच सील आणि एका कोल्ह्याचा मृत्यू झाल्याने शास्त्रज्ञही बुचकुळ्यात पडले आहेत. यासंबंधीचे संशोधन इमरजिंग इन्फेक्शियश डिसिजेज या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. मृत प्राण्यांमधील बर्ड फ्ल्यूच्या स्ट्रेनवर संशोधन केले असता या स्ट्रेनचे एकदा म्युटेशन झाल्याचे स्पष्ट झाले.

हा एक ‘एच 5 एन 8’ हा व्हायरस होता. हा व्हायरस म्युटेशनमुळेच सस्तनधारी सागरी जीवांपर्यंत पोहोचला. तसे पाहिल्यास अशा प्रकारचे म्युटेशन सर्वसामान्यपणे माणसाशी संबंधित असते. मात्र, यामुळे माणूस संक्रमित झाल्याचे उदाहरण समोर आलेले नाही. म्हणजेच या जीवांच्या मृत्युमुळे कोणत्याही माणसाच्या शरीरात बर्ड फ्लूचा व्हायरस पोहोचला नाही, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

Back to top button