TruthGPT : एलॉन मस्कचे घुमजाव! ‘AI’च्या स्पर्धेत उतरणार; नवीन प्लॅटफॉर्मचे नाव ही ठरलं… | पुढारी

TruthGPT : एलॉन मस्कचे घुमजाव! 'AI'च्या स्पर्धेत उतरणार; नवीन प्लॅटफॉर्मचे नाव ही ठरलं...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटर या सोशल साईटची आणि टेस्ला सारख्या कंपनीची मालकी असलेला एलॉन मस्क हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असणारी व्यक्ती. मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण काही दिवसांपूर्वी एआय वरील संशोधन थांबवा ते मानवतेसाठी घातक ठरू शकते अशी मागणी करणाऱ्या एलॉनने घुमजाव केले आहे. आता तो स्वतःच चॅटजीपीटी सारख्या एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यासाठी स्वत;चा एक एआय प्लॅटफॉर्म (TruthGPT) सुरु करत आहे. याबाबत मस्कने फॉक्सला दिलेल्या मुलाखती वेळी माहिती दिली. या प्लॅटफॉर्मच नावही ठरवण्यात आले आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर बातमी. (बातमी अपडेट होत आहे.)

माहितीनूसार,  एलॉन मस्क ChatGPT, OpenAI सारख्या एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) फ्लॅटफॉर्मला टक्कर देण्यासाठी स्वत:चा ट्रुथजीपीटी’ (TruthGPT) एआय प्लॅटफॉर्म लवकरच  सुरू करणार आहे. याबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे. याबाबत एलॉन यांनी फॉक्स न्यूज चॅनलने घेतलेल्या मुलाखतीत याबबत खुलासा केला आहे. ते यावेळी म्हणाले की, “मी काहीतरी सुरू करणार आहे. ज्याला मी ‘TruthGPT’ किंवा जास्तीत जास्त सत्यशोधक एआय म्हणतो जे विश्वाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करणार असेल, पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला वाटते की हा सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. या अर्थाने की एआय जे विश्व समजून घेण्याचा प्रयत्न करते.

संबंधित बातम्या

ओपन एआयला टक्कर देण्यासाठी मस्क अल्फाबेट इंकच्या गुगलच्या एआय संशोधकांद्वारे स्टार्टअप लाँच करत आहे, या प्रकरणाशी संबधित लोकांनी रॉयटर्सला सांगितले.

मस्कचे घुमजाव

एलॉन मस्कने अशा प्रकारे एआयच्या स्पर्धेत उतरून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्कने एआयच्या विकसनावरील संशोधन थांबवावे त्यावर बंदी आणावी अशी मागणी केली होती. अमेरिकेतील एका संस्थेने या बाबत एक ओपन लेटर टाकले होते. त्यावर एलॉन मस्क सह, तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळपास 1000 दिग्गजांनी एआय हे मानवतेसाठी घातक ठरू शकते. याचा वाईट परिणाम होईल, असे सांगत यावर बंदी आणणाऱ्या या ओपन लेटरवर स्वाक्षरी केली होती.

त्यामुळे आता घुमजाव करत स्वतःच एआय या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्लॅटफॉर्म निर्माण करण्याच्या स्पर्धेत उतरत असल्याने सर्वांनाच याचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही वाचा 

Back to top button