मेसेजला रिप्लाय द्यायचा कंटाळा आलायं! आता चॅटजीपीटी देईल तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजला उत्तर देईल

मेसेजला रिप्लाय द्यायचा कंटाळा आलायं! आता चॅटजीपीटी देईल तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजला उत्तर देईल

पुढारी ऑनलाईन: काही लोक टेक्स्ट मेसेजला उत्तर देण्यात खूपच स्लो असतात. जेव्हा असे लोक अनेक दिवस टेक्स्ट मेसेजला उत्तर देत नाहीत, तेव्हा त्यांच्या आळशीपणाची परिसीमा गाठली जाते. बऱ्याच लोकांना टेक्स्ट मेसेजपेक्षा कॉलवर बोलणे अधिक सोयीचे वाटते. आता अशा लोकांच्या समस्येवर एक पर्याय समोर आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते आता गिटहबच्या मदतीने चॅटजीपीटी व्हॉट्सअ‍ॅपशी इंटिग्रेट करू शकतात.

ChatGPT हे हे रायटिंगवर जास्त करत आहे. चॅटजीपीटीमुळे अॅमेझॉन किंडलवर ई-बुक्समध्ये वाढ होऊ शकते, म्हणजेच पुस्तके लिहून अनेकजण लेखक होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. आता चॅटजीपीटी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजलाही उत्तर देऊ शकते. आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे की ChatGPT तुमच्या WhatsApp वर येणाऱ्या सर्व प्रकारच्या मेसेजला उत्तर देऊ शकते. चला तर मग याचा वापर कसा करतात ते जाणून घेऊया…

सुरुवातीला तुम्हाला ChatGPT ला WhatsApp शी लिंक करावे लागेल. यासाठी GitHub ची मदत घ्यावी लागेल. एका डेव्हलपरने GitHub वर पायथन स्क्रिप्ट तयार केली आहे, जी तुम्हाला ChatGPT ला WhatsApp खात्याशी लिंक करू देते. यासाठी तुम्हाला लँग्वेज लायब्ररी मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल की चॅटजीपीटीने तुमच्या व्हॉट्सअॅप मेसेजला रिप्लाय द्यावा, तर तुम्हाला https://github.com/danielgross/whatsapp-gpt वर जावे लागेल.

  • तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला कोडवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला download zip वर क्लिक करावे लागेल.
  • आता फाईल उघडल्यावर Whatsapp-gpt-main दिसेल.
  • यामधून server.py निवडणे आवश्यक आहे.
  • नंतर ls टाइप करा आणि एंटर दाबा.
  • आता python server.py एंटर करा.
  • आता तुमच्या WhatsApp खात्यासह मोबाईल नंबर OpenAI Chat सह कॉन्फिगर केला जाईल.
  • यानंतर Verify I am a human वर क्लिक करा.
  • आता तुमच्या WhatsApp खात्यावर जा आणि OpenAI ChatGPT शोधा.
  • यानंतर तुम्ही त्यावर मेसेज पाठवून त्याची टेस्ट घेऊ शकता.
  • या सेटिंगनंतर, फक्त ChatGPT तुमच्या WhatsApp संदेशांना उत्तर देईल.
  • याशिवाय तुम्ही गुगल क्रोम एक्स्टेंशनचीही मदत घेऊ शकता. ChatGPT WhatsApp नावाचा विस्तार तुमच्या WhatsApp मेसेजला देखील उत्तर देऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news