Twitter वर युजरनेमचा होणार लिलाव : मस्क यांची आयडिया | पुढारी

Twitter वर युजरनेमचा होणार लिलाव : मस्क यांची आयडिया

पुढारी ऑनलाईन : ट्विटरचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. यासाठी व्हेरिफिकेनसाठी महिन्याला शुल्क आकारण्याचाही निर्णय झाला. याबरोबरच आता ट्विटरवर युजरनेम विकत घेण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. युजरनेमचा ऑनलाईन लिलाव करून त्यातून उत्पन्न वाढवण्याच ट्विटरचा विचार आहे. (Twitter is considering selling usernames)

युवर स्टोरी आणि काही इतर माध्यमांनी ही बातमी दिली आहे. डिसेंबर २०२२पासून हा विचार सुरू आहे. पण तो कधी प्रत्यक्षात येईल याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच सर्वच युजरनेम विक्रीसाठी उपलब्ध असतील की काही ठराविक याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

वर्षाभरात एक ही ट्विट केलेले नाही, तसेच लॉगिनही केलेले नाही, असे जवळपास १.५ अब्ज ट्विटर खाती आहेत, ती सगळीच बंद करण्यात येणार असल्याची घोषणा एलन मस्क यांनी गेल्या महिन्यात केली होती. ट्विटरच्य सध्याच्या धोरणानुसार युजरनेम विकता येत नाहीत. पण काही विशेष नावांत लोकांना जास्त रस असतो, अशा युजरनेमची ब्लॅकने विक्री होते.

एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर उत्पन्न वाढीच्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मनुष्यबळ कमी करणे, अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी शुल्क असे निर्णय मस्क यांनी आतापर्यंत घेतले आहेत.

हेही वाचा

Back to top button