एलन मस्क ट्विटरचे सीईओ पद सोडणार; नव्या सीईओसाठी शोध सुरू | Elon musk to step down as twitter CEO | पुढारी

एलन मस्क ट्विटरचे सीईओ पद सोडणार; नव्या सीईओसाठी शोध सुरू | Elon musk to step down as twitter CEO

भविष्यात फक्त सर्व्हर आणि सॉफ्टवेअरची जबाबदारी घेणार

पुढारी ऑनलाईन : अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहेत. मस्क यांनी स्वतःच ट्वीटवरून ही माहिती दिली आहे. पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर मस्क ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर आणि सर्व्हरच्या टीमचे नेतृत्व करतील.

“ट्वीटरच्या सीईओ पदासाठी दुसरा कुणी मूर्ख माणूस भेटला की मी हे पद सोडून देईन. त्यानंतर मी फक्त सर्व्हर आणि सॉफ्टवेअरच्या टीममध्ये सोबत कार्यरत राहीन,” असे ट्विट मस्क यांनी केले आहे.

मस्क यांनी ट्विटरवर एक पोल घेतला होता. ट्विटरच्या सीईओपदी राहिले पाहिजे की नको, याची विचारणा त्यांनी या पोलमधून केली होती. यात ५७.५ टक्के लोकांनी मस्क यांनी ट्विटरचे सीईओपद सोडावे असे मत व्यक्त केले होते तर ४२.५ टक्के लोकांनी मस्क यांनीच हे पद सांभाळावे असे म्हटले होते. या पोलमध्ये १.७५ टक्के लोकांनी भाग घेतला होता. या पोलचा जो काही निकाल येईल, तो मी मान्य करणार, असे मस्क यांनी म्हटले होते.

तर CNBCने एका वृत्तात एलन मस्क ट्विटरच्या सीईओ पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेत आहेत, असे म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यात मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला होता. त्यानंतर ट्विटरमधून बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.

हेही वाचा

Back to top button