Twitter Tick : ब्ल्यूसह, गोल्ड, ग्रे रंगात ट्विटरचे व्हेरिफाईड अकाऊंट्स लॉन्च; जाणून घ्या काय आहे ‘या’ रंगांचा अर्थ | पुढारी

Twitter Tick : ब्ल्यूसह, गोल्ड, ग्रे रंगात ट्विटरचे व्हेरिफाईड अकाऊंट्स लॉन्च; जाणून घ्या काय आहे 'या' रंगांचा अर्थ

पुढारी ऑनलाईन : ट्विटरने अखेर त्याचा अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग्राम अखेर लॉन्च केला आहे. पूर्वी ट्विटरचे सर्वच व्हेरिफाईड अकाऊंट हे ब्ल्यू टिकमध्ये दाखवण्यात आले होते. पण आता यामध्ये ब्ल्यूसह, गोल्ड आणि ग्रे रंगाचे टिक तुम्हाला ट्विटरवर दिसणार आहेत.

ट्विटरचे पेड व्हेरिफिकेशन फीचर हे सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात ते थांबवण्यात आले होते. हे पुन्हा सुरू केले असून त्याची किंमत अजूनही महिन्याला 8 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु Apple डिव्हाइसवर Twitter अॅप वापरणाऱ्यांसाठी आणि ब्ल्यू टिक असणाऱ्यांना 11 डॉलर्स सबस्क्रिप्शन चार्ज घेण्यात येणार असल्याचेही ट्विटरने ट्विट करत स्पष्ट केले आहे.

एका अहवालानुसार, ट्विटरने अकाऊंट्स विलगीकरण केले आहे. यासाठी विविध तीन प्रकराच्या रंगात ट्विटरच्या व्हेरिफाईड अकाउंट्ससाठी टिक जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये ट्विटरने गोल्ड, ब्ल्यू आणि ग्रे टिक अशा रंगात हे ट्विट दिले आहे. यामध्ये ट्विटरने बिझनेस व्हेरिफिकेशन ब्रँड्ससाठी गोल्ड टिक, राजकीय किंवा सरकारी संस्थांसाठी ग्रे टिक तर ब्ल्यू टिक हे सर्वसामान्य किंवा सेलिब्रेटी व्यक्तींसाठी कंपनीने उपलब्ध करून दिले आहे.

गेल्या महिन्यात, ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी याप्रकराची घोषणा ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवरून दिली होती. यावेळी मस्क यांनी हा प्रोग्राम लॉन्च करण्यासाठी उशिर झाल्याबद्दल “क्षमस्व, आम्ही पुढील आठवड्यात शुक्रवारी व्हेरिफाईड लाँच करत आहोत, असे ट्विटसुद्धा केले होते. त्यानुसार सोमवारपासून ट्विटरची ही सेवा कार्यरत करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button