पत्नीनं पतीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फिट केला नट-बोल्ट आणि... - पुढारी

पत्नीनं पतीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फिट केला नट-बोल्ट आणि...

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन मध्ये एक भितीदायक घटना समोर आली आहे. एक महिला तिच्या नवऱ्यावर संशय घेत होती. एवढ्यावर न थांबता तिने चक्क संशयाच्या रागातून पतीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी नट-बोल्ट बसवला. पण या लोखंडी नटला काढण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागले आहे. या घटनेमुळे पतीचा जीव धोक्यात आला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना युक्रेन मधील जपारोजे शहरातील आहे. एका वेबसाईटच्या अहवालानूसार, त्या महिलेला तिच्या पतीवर संशय होता. पती तिला फसवत असल्याच वाटत होते. त्या महिलेला अस वाटत होतं की, तिचा पती दुसऱ्या महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवत आहे. ती महिला पतीवर नाराज होती. यामुळे तिने बदला घेण्याचे नियोजन केले.

एका रात्री जेव्हा पती झोपला होता, तेव्हा महिलेने पतीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी नट-बोल्ट अडकवला. दरम्यान, पती झोपेतून जागा झाला. त्याला या घटनेमुळे वेदना होऊ लागल्या. यानंतर त्या पतीने तो लोखंडी नट स्वत: काढण्याचा प्रयत्न केला. पण वेदना वाढल्या. लगेच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पहिल्यांदा साबणाच्या पाण्याच्या मदतीने तो लोखंडी नट काढण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळाले नाही. त्यानंतर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरला नाही.

सर्जरीनंतरही वेदना

या सर्जरीसाठी शेवटी डॉक्टरांनी कोबरा रेस्क्यू टीमला बोलवल. या टीमने अँगल ग्राइंडरचा वापर करुन लोखंडी नट कट केला. या प्रक्रियेला जास्त वेळ गेला. त्या व्यक्तीस डॉक्टरांनी उपचार करुन घरी सोडले. यानंतर अनेक दिवस त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत होत्या.

हेही वाचलत का :

#26/11 : फ्रंटलाईन वर्करच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. सुजाता म्हणजेच मृण्मयी देशपांडेचा अनुभव

Back to top button