Funny Viral Video : पोपटाने पळवला पत्रकाराच्या कानातील ‘एअरपॉड’ (पाहा व्हिडिओ) | पुढारी

Funny Viral Video : पोपटाने पळवला पत्रकाराच्या कानातील 'एअरपॉड' (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाइन डेस्क : Funny Viral Video : तसं पाहिले तर पक्षी पाळीव नसतील तर आपल्या जवळ येत नाहीत. मग तो कोणताही पक्षी असो. मात्र, एक अतिशय मजेशीर आणि आश्चर्यजनक किस्सा एका पत्रकारासोबत घडला. ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक पत्रकार बातमीचे वार्तांकन करत असताना अचानक एक पोपट त्याच्या खांद्यावर येऊन बसला आणि त्याने पाहता-पाहता त्याच्या कानातील एअरपॉड पळवला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनी आपल्या कमेंट्स टाकल्या आहेत.

Funny Viral Video : पत्रकार निकोलस क्रूम हा टीव्हीवर बातमीचे लाइव्ह वार्तांकन करत होता. चोरींच्या घटनांमध्ये कशी वाढ झाली आहे. हे सांगत असताना अचानक एक पोपट त्याच्या खांद्यावर येऊन बसला. त्याने ते पाहिले आणि कॅमेरामनला इशा-याने त्याच्याबद्दल सांगितले. तो पर्यंत हा पोपट त्याच्या खांद्यावरून पुढे सरकला आणि त्याने आपल्या चोचीने त्याच्या कानातील एअरपॉड घेऊन भूरर्कन उडून गेला.

पत्रकार निकोलस क्रुम सॅंटियागो डी चिलीमध्ये दरोडे आणि सुरक्षिततेबद्दल थेट प्रक्षेपण करत होते. त्यावेळी ही अगदी आश्चर्यकारक आणि तितकीच मनोरंजक घटना कॅमेर-याद कैद झाली.

Funny Viral Video : हा व्हिडिओ स्पॅनिश भाषेत असला तरी तो प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटक-यांनी त्यावर अनेक वेगवेगळ्या कमेंट्स टाकत या मजेशीर व्हिडिओचा आनंद लुटला आहे.

हे ही वाचा :

Snakebite : किंग कोब्रा चावला, म्हणून आठ वर्षाच्या मुलाने पुन्हा दोनदा क्रोब्राला चावले अन् साप मेला

ट्विटरची ८ डॉलर ‘ब्लू टिक’ व्हेरिफिकेशन सेवा भारतात कधी सुरू होणार? एलॉन मस्क यांनी दिले उत्तर

Back to top button