Mexico : महापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Mexico : महापूर आणि भूकंपाने मेक्सिको हादरले, १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

मेक्सिको सिटी; पुढारी ऑनलाईन : मेक्सिको (Mexico) देश महापुरानंतर आज बुधवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.९ इतकी होती. मेक्सिकोच्या दक्षिणेला असलेल्या अकापुल्को शहरात भूकंपाचे अधिक धक्के बसले. या भूकंपाच्या प्रभावाने दूरवर असलेल्या मेक्सिको सिटी शहरातील इमारती हादरल्या.

दरम्यान, भूकंपाच्या आधी मेक्सिकोच्या (Mexico) मध्य भागात आलेल्या महापुरामुळे १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा अधिक समावेश आहे. मुसळधार पावसाचा सर्वांधिक फटका हिदाल्गो राज्यातील तुला शहराला बसला. येथील नदीला पूर आला आहे. यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले असल्याची माहिती मेक्सिको सरकारने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

महापुराशी संबंधित घटनांमध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला असून हे खूप दुःखदायक आहे, असेही सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, तुला शहरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाणी शिरल्यानंतर तेथील ४० रुग्णांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. पावसामुळे सुमारे २०० घरांचे नुकसान झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले…

अनेक हॉस्पिटलमध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडचण येत असल्याची माहिती मेक्सिको इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सेक्युरिटीचे संचालक रोब्लेडो (Zoe Robledo) यांनी दिली आहे.

अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे की, मेक्सिकोतील भूकंपाचा केंद्रबिंदू ग्युररो राज्यातील पुएब्लो माडेरो पासून ८ किलोमीटरवर पूर्व- दक्षिण भागात होता. या भूकंपाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पण भूकंपाच्या आधी हिडाल्गो राज्यातील तुला शहरात आलेल्या महापुराने कहर केला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news