स्त्री-पुरुष समानता; राज्यघटनेचा अविभाज्य अंग : अ‍ॅड. मेघा ठोंबरे | पुढारी

स्त्री-पुरुष समानता; राज्यघटनेचा अविभाज्य अंग : अ‍ॅड. मेघा ठोंबरे

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जगातील सर्वात मोठी लोकशाही शासनप्रणाली म्हणून भारताचा जगभर नावलौकिक आहे. स्त्री-पुरुष समानता हक्क हा लोकशाहीवर आधारित भारतीय राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे, असे मत अ‍ॅड. मेघा ठोंबरे यांनी व्यक्त केले. दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘स्त्री-पुरुष समानता व भारतीय राज्यघटना’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉ. रवींद्र मराठे होते.

राज्यघटनेने स्त्री-पुरुषांना देशाचे नागरिक म्हणून समान हक्क आणि अधिकार दिले आहेत. घटना निर्मितीत पंधरा महिलांचा असलेला उल्लेखनीय सहभाग समानतेच्या द़ृष्टीने महत्त्वाचा आहे.

घटनेतील कायद्यानेच हुंडाबळी, महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसा या गुन्ह्यांवर वचक राहिला आहे. घटनेने महिलांना दिलेले कायद्याचे सुरक्षा कवच आणि मूलभूत हक्क यांची जाणीव त्यांच्यामध्ये होणे आवश्यक आहे.

स्त्री-पुरुष समानता या विषयाची माहिती देताना त्यांनी त्या अनुषंगाने विविध केसेसची माहिती दिली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे निकालही सांगितले.

कार्यक्रमास प्रा. संपदा गुळवणी, कीर्ती कदम, न्रिपेशकुमार न्रिप, विभागप्रमुख डॉ. आर. डी. जाधव व डॉ. के. एम. अलास्कर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. मंजुश्री कदम प्रास्ताविक तर अंजली गायकवाड यांनी आभार मानले.

Back to top button