China and Taiwan | चीन जैविक हल्ल्याच्या तयारीत, तैवान हाय अलर्टवर, ‘बॅक्टेरिया बॉम्ब’ची भिती

China and Taiwan | चीन जैविक हल्ल्याच्या तयारीत, तैवान हाय अलर्टवर, ‘बॅक्टेरिया बॉम्ब’ची भिती
Published on
Updated on

बिजिंग; पुढारी ऑनलाईन : चीन आणि तैवानमध्ये (China and Taiwan) निर्माण झालेली तणाव स्थिती अद्यापही कायम आहे. दरम्यान, चीन तैवानवर जैविक हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याची चाहुल लागल्यानंतर तैवान जैविक युद्धाच्या विरोधात स्वत:ला तयार करत असल्याचे समजते. जैविक युद्धाविरूद्ध तैवान खूपच अनिश्चित आहे. काही रिपोर्ट्सनुसार, चीन 'बॅक्टेरिया बॉम्ब' (weaponising bacteria bombs) बनवत आहे. बॅक्टेरिया बॉम्बपासून देशाचे रक्षण करण्यासाठी तैवानने काही कठोर पावले उचलली आहेत.

अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावर चीनने तीव्र आक्षेप घेतला. यामुळे चीनने तैवानच्या विरोधात कारवाया सुरु केल्या आहेत. चीनने तैवानला सर्व बाजूंनी घेरले आहे. यामुळे चीन कोणत्याही क्षणी तैवानवर हल्ला करु शकतो, अशी स्थिती आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी तैवानने केली आहे. याआधी चीनने तैवानवर ११ क्षेपणास्त्रे डागली होती. तैवानवर सोडलेली यातील काही क्षेपणास्त्रे जपानच्या समुद्रात जाऊन पडली. यामुळे भिती व्यक्त करण्यात आली.

इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, चीन जैविक युद्धाची तयारी करत आहे. तैवानला धोका पोहचवण्यासाठी शस्त्र म्हणून चीन बॅक्टेरिया बॉम्ब बनवत आहे. या पार्श्वभूमीवर तैवानमध्ये प्रवाश्यांसाठी कडक कोविड प्रोटोकॉल कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये आरटी-पीसीआर चाचण्या, हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म भरणे आणि हॉटेलमध्ये क्वारंटाईन यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

IndiaToday च्या 'रिपोर्टर्स डायरी' नुसार, "तैवानमध्ये कोणत्याही विषाणूच्या प्रवेशाच्या भीतीमुळे अन्न उत्पादनांबाबत कठोरपणे प्रतिबंध घालण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. संपूर्ण जगाने कोरोनाचे नियम शिथिल केलेले असताना तैवान अजूनही या कडक स्वरुपाच्या कोविड प्रोटोकॉलचे पालन का करत आहे?. कारण तैवानला भीती आहे की चीन जैविक युद्धाची तयारी करत आहे. चीन 'बॅक्टेरिया बॉम्ब' तयार करत आहे."

आफ्रिकन स्वाइन फीव्हर (ASF) चा प्रसार रोखण्यासाठी तैवानने डुकराच्या मांस उत्पादनांच्या (pork products) आयातीवर बंदी घातली आहे. तैवानमध्ये डुकराच्या मांसापासून बनवलेले मूनकेक मून फेस्टिव्हलदरम्यान भेटवस्तू म्हणून दिले जातात. यामुळे आगामी मून फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर पोर्क उत्पादनांच्या आयातीवर प्रतिबंध लादण्यात आले आहेत. तैवानच्या सेंट्रल एपिडेमिक कमांड सेंटर (CECC) ने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अँटी-कोविड उपाययोजना केल्या आहेत.

चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेत कोविड१९ विषाणूबाबतचे संशोधन करण्यात आले होते. हा विषाणू वुहानमधून जगभर पसरला आणि जगभरात हाहाकार उडाला. कोरोनामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. यामुळे कोरोना हा चीनचे जैविक हत्यार असल्याची शंका जगभरात व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर तैवानने कोरोना सारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली आहे. (China and Taiwan)

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news