भावना गवळी यांच्या कार्यालयांची ईडीकडून तब्बल १० तास चौकशी

भावना गवळी यांच्या कार्यालयांची ईडीकडून तब्बल १० तास चौकशी
Published on
Updated on

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांनी शंभर कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप वाशीम येथील पत्रकार परिषदेत केला होता. तसेच यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानुसार आज सकाळी ईडीचे पथके सदर चौकशीसाठी वाशिम जिल्ह्यात दाखल झाले आहे.

सकाळपासून रिसोड तालुक्यातील महिला उत्कृष्ट प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, दि रिसोड अर्बन को-ऑप, सोसायटी, भावना ॲग्रोटेक सर्विस लिमिटेड मधील विविध दस्तऐवजाची सकाळी११ पासून रात्री ८ पर्यंत तपासणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

मात्र यादलबद्दल अधिकारी यांनी बोलण्यास नाकार दिला आहे. आजची कारवाई संपली असून उद्या पुन्हा चौकशी होते का हे बघावे लागणार आहे. आजची चौकशी करून ईडीचे अधिकारी बाहेर पडले.

मात्र या छापेमारीतून नेमके आता काय बाहेर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना, भाजपमध्ये जुंपली

गवळी यांच्या संस्थांवर छापे पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे.

वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.

यानंतर आज मुंबई येथील ईडीचे अधिकारी रिसोड तालुक्यात धडकले. काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला पोहोचले.

काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news