United Nations : सुरक्षा परिषदेने 'तो' प्रस्ताव स्वीकारला; पण... | पुढारी

United Nations : सुरक्षा परिषदेने 'तो' प्रस्ताव स्वीकारला; पण...

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : संयुक्त राष्ट्र (United Nations) सुरक्षा परिषदेने सोमवारी एक प्रस्ताव पारित केला आहे, ज्यामध्ये लोकांना स्वातंत्र्यरित्या अफगाणिस्तान सोडण्याच्या बांधिलकीबद्दल आवश्यकता व्यक्त केली आहे. पण, फ्रांसचे राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्राॅनद्वारे ‘सुरक्षित क्षेत्रा’चा उल्लेख करण्यात आलेला नाही.

हा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटिनद्वारे तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मांडलेल्या १३ मतांवर कोणताही विरोध करण्यात आला आहे. मात्र, त्यावर चीन आणि रशियाने विरोध दर्शविला आहे. प्रस्तावात असं म्हंटलं आहे की, सुरक्षा परिषदेला आशा आहे की, तालिबान अफगाणी आणि इतर विदेशी नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षित आणि व्यवस्थितरित्या जाऊ देण्याची परवानगी देतील.
२७ ऑगस्टला तालिबान्यांकडून २७ ऑगस्टला एक विधान करण्यात आलं होतं. त्यामध्ये कट्टर इस्लामवाद्याकडून म्हंटलं होतं की, अफगाणी नागरिकांना विमानाद्वारे किंवा जहाजाद्वारे देश सोडून इतर देशात जाऊ शकतात. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेकडून जो प्रस्ताव काढला आहे, त्यात तालिबान्यांनी दिलेला शब्द पाळतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
सुरक्षा परिषदेचा हा प्रस्ताव महत्वाचा आहे.  हा प्रस्ताव पारित केला जाईल की नाही, याबाबात अजूनही स्पष्ट झालेलं नाही. इंटरनॅशनल क्रायसिस ग्रूपचे संयुक्त राष्ट्र विशेषज्ज्ञ रिचर्ड गोवन म्हणाले की, “विमानतळ खुला करण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्राला मदत करण्याचा एक संकेत तालिबान्यांनी दिला आहे, असं या या प्रस्तावातून दिसतं.”

Back to top button