kabul airport वरील सैनिकांवरून तालिबान्यांची अमेरिकेला खुली धमकी

kabul airport वरील सैनिकांवरून तालिबान्यांची अमेरिकेला खुली धमकी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : काबूल विमानतळ (kabul airport) अमेरिकेन सैनिकांच्या वर्चस्वाखाली आहे. त्यामुळे तालिबान्यांनी अमेरिकेला खुली धमकी दिली आहे. तालिबान संघटनेचा प्रवक्ता सोहेल शाहीन सोमवारी म्हणाला की, अमेरिकेने आपलं सैनिक माघारी बोलविण्यात वेळ करत असेल, तर त्याचे भयंकर परिणाम भोगोवे लागतील. ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकेने सैनिक परत बोलवले नाही, तर त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील.

तालिबान्यांनी अफगाणिस्तावर वर्चस्व मिळविण्यानंतर देश सोडून जाण्याची धडपड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. इतर देशांतील अफगाणिस्तानात असणारे लोक मोठ्या प्रमाणात आपापल्या देशात परतू लागले आहेत. अशा परिस्थितीत तालिबान्यांचं वर्चस्व स्थापन झाल्यामुळे लोकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचं सैनिक काबूल विमानतळावर उपस्थित आहे.

१५ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व स्थापन केल्यानंतर परिस्थिती बिघडत चालली आहे. मोठ्या प्रमाणात लोक देश सोडून जात आहेत. त्याशिवाय विमानतळावर आपापल्या देशाकडे परतण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमत आहेत. या काबूल विमानतळ (kabul airport) येथे लोकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे सैनिक तैनात आहेत.

अमेरिकेच्या सैनिकांच्या म्हणण्यानुसार काबूल विमानतळावरून वेगवेगळ्या देशांमध्ये विमानांचं उड्डाण होत आहे. ४०० हून जास्त भारतीय नागरिक अफगाणिस्तानमधून भारतात परतले आहे. असं असूनही मोठ्या प्रमाणात काबूल विमानतळावर लोक अडकून पडलेले आहेत.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

हे ही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news