धर्मगुरू : तालिबान्यांना रोखा अन्यथा भारतासाठी धोका; शिया धर्मगुरूंचं वक्तव्य

अफगाणिस्तान : तालिबान क्रूर प्राण्यांचं संघटन; शिया धर्मगुरूंचं वक्तव्य
अफगाणिस्तान : तालिबान क्रूर प्राण्यांचं संघटन; शिया धर्मगुरूंचं वक्तव्य

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानात तालिबाने जे वर्चस्व मिळवलं आहे, त्यावर शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जव्वाद यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यांनी असं म्हंटलं आहे की, "तालिबानांंविरोधात जग एकत्र आलं नाही आणि त्यांना रोखलं नाही, तर भारतासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो", असा सतर्कतेचा इशारा मौलाना कल्बे जव्वाद यांनी दिला.

ते एका धार्मिक कार्यक्रमात बोलत होते. या शिया धर्मगुरूने असंही म्हंटलं आहे की, तालिबान हे अमेरिका आणि इस्त्राईलनं उभं केलेल्या क्रूर प्राण्यांचं संघटन अशी उपमा दिली आहे. या संघटनेमध्ये माणसं नाहीत तर, क्रूर जनावरं आहेत. काही वर्षांपूर्वीच तालिबान्यांनी पाकिस्तानातील शाळेवर हल्ला करून लहान मुलांचा जीव घेतला होता. यापेक्षा जास्त क्रूरता काय असू शकते", असं मत मौलाना कल्बे जव्वाद मांडलेलं आहे.

तालिबान्यांविरोधात संपूर्ण जग एकत्र यायला हवं. मात्र, त्यांच्याविरोधात जगभरात एकता दिसून येत नाही. त्यांच्या कृत्यांवर वेळीच आवर घालायला हवा. अफगाणिस्तानात सध्याची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे, असंही हे शिया धर्मगुरू म्हणताहेत. यासगळ्या पार्श्वभूमीवर एका बाजूला अशा परिस्थितीवर चिंता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे असेही की धार्मिक नेते आहे जे तालिबान्यांचं समर्थन करत आहे.

अमेरिकेच्या सैन्याने माघार घेताच तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला अफगाणिस्तानातून धडा घेण्याच सल्ला दिला आहे. इतकंच नाही तर,जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची तुलना अफगाणिस्तानसोबत केलेली आहे.

यावर मुफ्तींनी केंद्राला इशारा दिला आहे की, "आमची परीक्षा घेऊ नका. आमचे मार्ग सुधारणे, परिस्थिती समजून घेणे आणि आमच्या शेजारी काय चालले आहे ते पहा. महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आपली पिशवी गुंडाळून पळून जावं लागलं. तुम्हाला जम्मू-काश्मीरवर चर्चा करण्याची संधी आहे", असंही मुफ्ती केंद्र सरकारला म्हणाल्या.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news