Manners : मॅनर्स म्हणजे नेमकं काय? ते कसे पाळायचे?

गुड मॅनर्स म्हणजे नेमकं काय? ते कसे पाळायचे?
गुड मॅनर्स म्हणजे नेमकं काय? ते कसे पाळायचे?
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : मॅनर्स (Manners) म्हणजे नेमकं काय? सार्वजनिक पातळीवर वावरत असताना आपल्या कानावर मॅनर्स (Manners) नावाचा शब्द पडत असतो. त्यातून माणसांचं व्यक्तीमत्व कसं दिसून येतं? प्रेम, आदर, कौतुक, या गोष्टी मॅनर्सचा (Manners) भाग असतात का? या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात जाणून घेऊ या…
  1. सलगपणे एखाद्या दोनपेक्षा जास्त वेळा फोन काॅल करू नका. दोन वेळा काॅल करूनही त्याने काॅल उचलला नाही तर, समजा संबंधित व्यक्ती महत्वाच्या कामात आहे.
  2. ज्या व्यक्तीने तुम्हाला उसणे पैसे दिले आहे, त्या पैशांची आठवण होण्याआधी त्या व्यक्तीला त्याचे पैसे परत देऊन टाका. त्यातून तुमचा प्रामाणिकपणा आणि स्वच्छ चारित्र्य दिसून येते. हाच नियम एखादा पेन, छत्री किंवा जेवणाच्या डब्याबद्दलही लागू होतो.
  3. जेव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती हाॅटेलमध्ये जेवणाचं आमत्रण देतो, तेव्हा मेनूमधील महागडी डिश कधीच मागवू नका.
  4. अरे, तुम्ही अजून  लग्न केलं नाहीत?, तुम्हाला अजून मुले नाहीत?, तुम्ही अजूनही घर किंवा चारचाकी विकत घेतली नाहीत?, असले प्रश्न कुणालाही विचारू नका.
  5. तुमचं अनुकरण करणाऱ्या व्यक्तीला नेहमी सकारात्मक वागणूक द्या. भलेही ती व्यक्ती मुलगी किंवा मुलगा असो… ज्युनियर असो किंवा सिनियर असो… त्याच्याने काहीच फरक पडत नाही. सार्वजनिक पातळीवर एखाद्याला चांगली वागणूक दिल्यामुळे तुम्ही लहान किंवा मोठे होत नाही.
  1. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीसोबत रिक्षा किंवा टॅक्सीतून प्रवास करता, तेव्हा त्यांनी तुमच्या प्रवासाचे पैसे दिले, तर पुढच्या वेळी तुम्ही दोघांच्या प्रवासाचे नक्की पैसे द्या.
  2. प्रत्येकाच्या मतांचा आदर करा. कारण, त्या विविध मतांच्या वेगवेगळ्या छटा असतात. आणि कधी दुसरं मत हे पर्यायासाठी कधीही चांगलंच असतं.
  3. लोक जेव्हा बोलत असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये व्यत्यय आणू नका. त्यांना बोलू द्या. ते जे सांगताहेत ते सांगू द्या… शेवटी त्यांच्या बोलण्यातून जे चांगलं आहे गाळून घ्या.
  4. जर एखाद्या तुम्ही केलेली चेष्टा खपत नसेल, तर त्याची चेष्टा करणं थांबवा. आणि पुन्हा त्याची चेष्टा करू नका. यातून तुमटे सौजन्य दिसून येते.
  5. जो कुणी तुमची मदत करेल, त्याला "धन्यवाद" किंवा "आभार" मानायला विसरू नका.
  1. एखाद्याचं कौतुक करायचं असेल तर चार माणसांमध्ये त्याचं कौतुक करा. आणि जर एखाद्याचे दोष दाखवून द्यायचे असतील, तर त्याला वैयक्तिकरित्या किंवा खासगीत दोष दाखवून द्या.
  2. एखाद्या व्यक्तीच्या जाडेपणावर कधीही टिप्पणी करू नका. उलट तुम्ही छान दिसताहात, असे त्या व्यक्तीचे कौतुक करा. हा एक मॅनर्सचा (Manners) भाग आहे.
  3. जर एखादा व्यक्ती मोबाईलवरील फोटो दाखवत असेल, तर त्या मोबाईलला हात लावत ते फोटो उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करून नका. कारण, पुढे कोणते फोटो असतील, याबद्दल तुम्हाला कोणतीच कल्पना नाही.
  4. जर तुमचे सहकारी डाॅक्टरच्या अपाॅइमेंटबद्दल सांगत असतील, तर "कोणत्या आजारीसाठी?", असा प्रश्न त्यांना विचारू नका. फक्त इतकंच म्हणा की, "मला आशा आहे की, बरे व्हाल." जर त्या व्यक्तीला त्याच्या आजाराबद्दल सांगायचं असेल तर स्वतःहून सांगेल.
  5. सर्वांशी आदराने वागा. तुम्ही जसे वरिष्ठांना आदराची वागणूक देता, तशीच वागणूक सफाई कामगारालाही द्या. तुम्ही कोणाशी किती उद्धट वागता, यावरून लोकांच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण होऊ शकतो.या उलट तुम्ही लोकांशी आदराने वागलात, तर लोक तुम्हाला लक्षात ठेवतील.
  1. जर तुमच्याशी एखादा व्यक्ती थेट बोलत असेल, तर तुम्ही मोबाईलमध्ये पाहणं किंवा मोबाईल चाळणं योग्य नाही. त्यामुळे तुमच्याबद्दल नकारात्मक मत तयार होते.
  2. जोपर्यंत तुम्हाला कोणी सल्ला विचारत नाही, तोपर्यंत कुणालाही सल्ला देण्याच्या फंदात पडू नका.
  3. तुम्ही एखाद्याला बऱ्याच काळानंतर भेटला. तर, त्याला त्याच्या पगाराविषयी किंवा वयाविषयी विचारू नका. जर त्याला सांगायचं असेल तर तो स्वतःहून सांगेल.
  4. तुमच्या व्यवसायाकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत करा.
  5. जर तुम्ही कोणाशी रस्त्यावर बोलत असाल, तर तुमच्या डोळ्यांवरील सनग्लास काढून ठेवा. हा समोरच्या व्यक्तीला आदर देण्याचा भाग आहे. त्याचबरोबर संवाद सुरू असतात आय-काॅन्टॅक्ट खूप महत्वाचा असतो.
  6. गरीब लोकांमध्ये तुमच्या श्रीमंतीबद्दल किंवा मुले नसण्याबद्दल कधीच बोलू नका.
  7. एखाद्याने चांगला संदेश पाठवला असेल, तर शक्य तितक्या लवकर त्या संदेशाबद्दल "धन्यवाद" म्हणा. आणि इतरांचं कौतुक करा.

पहा व्हिडीओ : प्रयत्न करणाऱ्या यश मिळतेच – विश्वास नांगरे पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news