आंग सान सू की यांच्यावर नामुष्की | पुढारी

आंग सान सू की यांच्यावर नामुष्की

लंडन :

म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांबाबत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर स्टेट काऊन्सिलर आंग सान सू की यांचा ऑक्सफोर्ड पुरस्कार परत घेण्यात आला आहे. ऑक्सफोर्ड सीटी कॉन्सिलने याबाबत मतदान घेतले होते. हिंसाचाराच्या घटना डोळे मिटून पाहणार्‍या व्यक्तीला हा सन्मान स्वतःकडे ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही, असे मत कॉन्सिलने व्यक्त केले होते. 1997 मध्ये हा पुस्कार आंग सान सू की यांना देण्यात आला होता. कॉन्सिलने घेतलेल्या मतदानात बहुसंख्य सदस्यांनी पुरस्कार मागे घेण्याच्या बाजूने मतदान केले. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आंग सान सू की यांच्यावर मोठी नामुष्की आली आहे.

Back to top button