‘ऑस्कर’मधून ‘न्यूटन’ बाहेर | पुढारी | पुढारी

‘ऑस्कर’मधून ‘न्यूटन’ बाहेर | पुढारी

लॉस अँजलिस : वृत्तसंस्था

जागतीक पातळीवर चित्रपट जगतासाठी मानचा असणार्‍या ‘ऑस्कर’ पुरस्काराच्या शर्यतीमधून भारताचे प्रतिनिधत्व करणारा ‘न्यूटन’ हा चित्रपट आता बाहेर पडला आहे. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागातून ‘न्यूटन’ला नामांकन मिळाले होते.

परंतु, त्याला अंतिम फेरीत धडक मारता आली नाही. ‘अ फॅनटॅस्टिक वुमन’, ‘इन द फेड’, ‘ऑन बॉडी अँड सोल’, ‘फॉक्सट्राट’, ‘दी इनसल्ट’, ‘लवलेस’, ‘द वुंड, फेलिसिटे’, ‘द स्न्वायर’ या नऊ सिनेमांमध्ये आता ऑस्करसाठी चुरस होणार आहे.

Back to top button