‘चप्‍पल चोर पाकिस्‍तान’; यूएसमध्‍ये निषेध  | पुढारी

'चप्‍पल चोर पाकिस्‍तान'; यूएसमध्‍ये निषेध 

वॉशिंग्‍टन : वृत्तसंस्‍था  

कुलभूषण जाधव यांच्‍या कुटुंबीयांना पाकिस्‍तानने दिलेल्‍या वागणुकीचा वॉशिंग्‍टनमध्‍ये निषेध करण्‍यात आला. वॉशिंग्‍टनमधील पाकिस्‍तान दूतावासाबाहेर भारतीयांनी आणि बलूच नागरिकांनी पाकचा निषेध करत आंदोलन केले. आंदोलकांनी ‘पाकिस्‍तान चप्‍पल चोर’ असे लिहिलेले फलक हातात घेऊन घोषणा दिल्‍या. 

यावेळी आंदोलकांनी फलकांसोबत चप्‍पलादेखील आणल्‍या होत्‍या. ‘जेव्‍हा कुलभूषण जाधव यांचे कुटूंब संकटात होते, तेव्‍हा पाकने त्‍यांच्‍या चप्‍पलादेखील चोरल्‍या. म्‍हणून आम्‍ही पाकला देण्‍यासाठी चप्‍पला घेऊन आलो आहोत. पाकिस्‍तानचा अर्थ काय आहे? अमेरिकेकडून डॉलर घेणे आणि हिंदुस्‍थानकडून चप्‍पला खाणे’, असे आंदोलकाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.  

२५ डिसेंबरला कुलभूषण जाधव यांच्‍या आई आणि पत्‍नी या जाधव यांना भेटण्‍यासाठी इस्‍लामाबादला गेल्‍या होत्‍या. मात्र, पाक सरकारने मुजोरीपणा दाखवत जाधव यांच्‍या पत्‍नीच्‍या चप्‍पलच्‍या जोड काढून घेतल्‍या. चप्‍पलामध्‍ये धातूसदृश्‍य वस्‍तू असल्‍याचा कांगावा पाकने केला होता. यानंतर पाकच्‍या या कांगाव्‍याचा संपूर्ण भारतात निषेध करण्‍यात आला. देशभरातून याबद्‍दल संतप्‍त प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्‍यात आल्‍या होत्‍या. 

Back to top button