इम्रान खान यांनी लादेनला केलेल्या ‘त्या’ शब्दप्रयोगावरून सगळेच हैराण! | पुढारी

इम्रान खान यांनी लादेनला केलेल्या 'त्या' शब्दप्रयोगावरून सगळेच हैराण!

इस्लामाबाद :  पुढारी ऑनलाईन

दहशतवाद संपवण्याबाबत पाकिस्तानचा हेतु काय आहे, हे देशाच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या विधानावरून स्पष्ट होते. जगभरात भयानक दहशतवादी हल्ले करणार्‍या अल-कायदाचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला इम्रान खान यांनी ‘शहीद’ म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरूद्ध सध्या कोणतेही पाऊल उचललेलं नाही. परंतु, दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा पाकिस्तानवर सातत्याने  आरोप होत असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांनी हे वक्तव्य केले आहे.

अधिक वाचा : ‘केजरीवाल मॉडेल’चा विजय!, नायब राज्यपालांनी घेतला ‘तो’ आदेश मागे

इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अल कायदाचा सुत्रधार दहशतवादी लादेनला संसदेत ‘शहीद’ म्हटले आहे. इतकेच नव्हे तर दहशतवादाविरूद्धच्या युद्धात पाकिस्तानने अमेरिकेला पाठिंबा देऊ नये, असेही खान म्हणाले. अमेरिकेवर हल्ला चढवत खान म्हणाले की, अमेरिकन सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला ‘शहीद’ केले आणि पाकिस्तानलाही सांगितले नाही आणि त्यानंतर संपूर्ण जगाने पाकिस्तानचा अपमान करण्यास सुरुवात केली.

अधिक वाचा : पाकिस्तानात श्रीकृष्ण मंदिराची उभारणी!

खान म्हणाले की, अमेरिकेच्या दहशतवादाविरूद्ध युद्धात पाकिस्तानने आपले ७० हजार लोक गमावले. या घटनेमुळे जे लोक पाकिस्तानच्या बाहेर होते त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे खान म्हणाले. २०१० नंतर पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले झाले आणि सरकारने केवळ त्याचा निषेध केला. अमेरिकेच्या अ‍ॅडमिरल मालन यांना पाकिस्तानवर ड्रोन हल्ले का केले जात आहेत असे विचारले असता ते म्हणाले की सरकारच्या परवानगीने ही कारवाई केली जात आहे.

अधिक वाचा : जगातील ‘या’ देशांत कोरोनाची दुसरी लाट

इम्रान खान यांनी असे वादग्रस्त वक्तव्याची ही पहिलीच वेळ नाही. खान हे ओसामावर मवाळ भुमिका असल्याचेही दिसून येत आहे. त्यांनी अनेक वेळा ओसामाला दहशतवादी म्हणून नाकारले आहे. अगदी तालिबानी सेनानींचे ‘भाऊ’ असेही वर्णन केले आहे. मागच्या सरकारच्या काळात त्यांनी ड्रोन हल्ल्यांचा उघडपणे निषेध केला होता यावर त्यानी ड्रोन हल्ले थांबल्यास तालिबानी कारवायाही थांबतील असे वक्तव्य केले होते.

Back to top button