डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून कोरोना पॉझिटिव्ह! | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून कोरोना पॉझिटिव्ह!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

जगात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अमेरिकेत कोविड-१९ चा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला असून तेथील नागरिकांमध्ये मोठ्या संख्येने विषाणूचे संक्रमण होत आहे. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरची मैत्रीण किंबर्ली गिलफॉयलचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. अमेरिकन माध्यमांनी याची माहिती दिली. किम्बर्ली ही अमेरिकेतील एका प्रसिद्ध टीव्ही वाहिनीतील व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या काही काळापासून डोनाल्ड ट्रम्प जूनियरला ती डेट करत आहे.

आणखी वाचा : अन्यथा गंभीर परिणाम भोगाल, ‘या’ छोट्या देशाची चीनला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ४ जुलैचे माउंट रशमोर येथील भाषण ऐकण्यासाठी तसेच दक्षिण डकोटा येथील फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी किम्बर्लीने गिलफॉयलने या भागांचा प्रवास केला होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ५१ वर्षीय किम्बर्लीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच तिला तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले. 

किम्बर्ली गिलफॉयल हिची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींमध्ये गणना होते. ट्रम्प प्रशासनाकडून राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची नियमित चाचणी घेतली जाते. त्या अंतर्गत किम्बर्लीची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ती पॉझिटिव्ह आढळली. 

आणखी वाचा : नेपाळी पंतप्रधानांवरील संकट सोमवारपर्यंत टळले!

किम्बर्लीची प्रकृती सध्या ठीक आहे. सध्या तिच्यावर आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. किम्बर्लीमध्ये कुठल्याही प्रकारे कोरानाची लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे तिची पुन्हा एकदा कोरोना चाचणी होईल. त्यानंतर समजेल की पहिला पॉझिटिव्ह आलेला अहवाल खरा होता की खोटा, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अर्थ विषयक समितीच्या सदस्या सर्जियो गोर यांनी दिली आहे. 

सर्जियो म्हणाल्या की, सध्या दक्षता म्हणून किम्बर्ली यांना आपले सारे कार्यक्रम, बैठका रद्द कराव्या लागतील. तसेच डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर यांचीही चाचणी करण्यात आली. मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे, असेही त्यांनी सांगीतले.

आणखी वाचा : भारत, अमेरिकेनंतर आता जपानकडून चीनला झटका देण्याची तयारी सुरु!

Back to top button