धक्कादायक! ऑक्सफर्डनं कोरोनावरील लसीची चाचणी थांबवली, सुरक्षेचं दिलं कारण  | पुढारी

धक्कादायक! ऑक्सफर्डनं कोरोनावरील लसीची चाचणी थांबवली, सुरक्षेचं दिलं कारण 

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आहे. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. मात्र, अशातच एका धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अस्ट्रा झेनेका लसीची मानवी चाचणी थांबविण्यात आली आहे. मानवी चाचणीत सहभागी झालेला एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव चाचणी थांबण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

जगभरात कोरोनाचा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस येत्या काही दिवसांत तयार होणार असल्याचे सांगण्यात आले होते. अशात लसीसंदर्भात चिंता व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. या लसीची चाचणी थांबवण्यात आली आहे. “चाचणी थांबवण्याची ही नेहमीची बाब आहे. जेव्हा एखाद्या चाचणीमध्ये संभाव्यरित्या आजार उद्भवू लागतो तेव्हा असे घडते,” असे अस्ट्रा झेनेका या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीने ईमेलद्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अस्ट्रा झेनेका नावाच्या औषध बनवणाऱ्या कंपनीबरोबर ऑक्सफर्ड ही लस तयार करत आहे. अमेरिकेच्या या फार्मा कंपनीशी (अ‍ॅस्ट्रा झेनेका) भारतातील सिरम इन्स्टिट्यूटचा करार झाला आहे.

या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. मात्र, अंतिम टप्प्यात या लसीच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवला. लसीच्या मानवी चाचणीत सहभागी झालेला एक व्यक्ती आजारी पडला आहे. मात्र, तो नेमका कशामुळे आजारी पडला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

वाचा अन्य काही बातम्या…

शाळा उघडणार २१ सप्टेंबरपासून, पण ‘या’ इयत्तांनाच परवानगी!

कंगनाचे मुंबईत येण्यापूर्वी ट्विट, ‘ना डरूंगी, ना झुकूँगी’

Back to top button