युक्रेनला मदत कराल तर उद्‍ध्‍वस्‍त करु : 'नाटो'ला पुतीन यांची धमकी | पुढारी

युक्रेनला मदत कराल तर उद्‍ध्‍वस्‍त करु : 'नाटो'ला पुतीन यांची धमकी

मॉस्‍को : पुढारी ऑनलाईन

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ५० दिवसांनंतरही सुरुच आहे. अनेक देशांनी युद्धविरामासाठी प्रयत्‍न केले; पण दोन्‍ही देश आपल्‍या मागण्‍यांवर मान्‍य असल्‍याने ते विफल ठरले.  अमेरिकेतील एक शिष्‍टमंडळ लवकरच युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की यांची भेट घेण्‍यासाठी येणार आहे. अशातच रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष ब्‍लादमीर पुतीन यांनी पुन्‍हा एकदा नाटो राष्‍ट्रांना धमकी दिली आहे.दरम्‍यान, रशियाचे शेजारील देश पोलंड, लिथुआनिया, लातविया आणि एस्‍टोनियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष युक्रेनमध्‍ये गेले आहेत. त्‍यांनी युक्रेनमधील सद्‍यस्‍थितीची पाहणी केली. या चारीही देशांनी युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेंलेस्‍की यांचे समर्थन केल्‍याने दाेन्‍ही देशांमधील संघर्ष आणखी विकाेपाला जाईल, अशी भीती व्‍यक्‍त हाेत आहे.

नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ( नाटो ) मधील सदस्‍य देशांनी जर युक्रेनला मदत केली तर तुम्‍हाला उद्‍ध्‍वस्‍त करु, तुमची वाहने आणि शस्‍त्रसाठाही नष्‍ट करु, अशी धमकी पुतीन यांनी दिली आहे.

ऑस्‍ट्रेलियाकडून रशियामधील १४ कंपन्‍यांवर प्रतिबंध

ऑस्‍ट्रेलियाने रशियाला मोठा दणका दिला आहे. या देशाने रशियातील १४ मोठ्या कंपन्‍यांशी असलेले सर्व व्‍यवहार बंद केले आहेत. यामध्‍ये दळणवळण व जलवाहतुकीशी संबंधित कंपन्‍यांचा समावेश आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे लहान देश उद्‍ध्‍वस्‍त होण्‍याचा धोका : संयुक्‍त राष्‍ट्र

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे लहान देश उद्‍ध्‍वस्‍त होण्‍याचा धोका आहे, असे संयुक्‍त राष्‍ट्रने म्‍हटलं आहे. या युद्धामुळे लहान देशातील खाद्‍य आणि उर्जा संकट निर्माण होवू शकते, असा इशाराही दिला आहे. दरम्‍यान, रशियाचे शेजारील देश पोलंड, लिथुआनिया, लातविया आणि एस्‍टोनियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष युक्रेनमध्‍ये गेले आहेत. त्‍यांनी युक्रेनमधील सद्‍यस्‍थितीची पाहणी केली. या चारीही देशांनी युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेंलेस्‍की यांचे समर्थन केले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button