

पुढारी ऑनलाईन डेस्क:
रशिया-युक्रेनमधील युद्धाचा आज १७ वा दिवस आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढतच आहे. जगातील अनेक देश विविध निर्बंध लादून रशियाची आर्थिक कोंडी करत आहेत. तरीही रशियाच्या युक्रेनमधील विविध शहरांवरील हल्ले सुरुच ठेवले आहेत. राजधानी कीव्हच्या नजीक रशियन सैन्य पोहचले आहे. आता कीव्ह शहराच्या पूर्व भाग, नीपर नदी परिसर आणि ब्रोवरी येथे जोरदार लढाई सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
युक्रेनच्या एका खासदाराने टिवट्रवर माहिती देताना म्हटलं आहे की, १० पिस्तुलधारांनी मेलिटोपोल शहराचे महापौर इव्हान फेडोरॉव यांचे अपहरण केले. शुक्रवारी रात्री उशिरा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी या अपहरणाच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच फेडोरोव शहरात रशियन सैन्याने कब्जा केला. यावेळी रशियन लष्काराला सहकार्य करण्यास युक्रेनच्या जवानांनी चर्चा करण्यास नकार दिला. रशियन सैनिकांनी महापौर इव्हान यांना शहरातील आपत्तकालीन सेंटर ठेवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
अमेरिकेने रशियाविरोधात कठोर पावले उचणार असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या नेड यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या व्यापार विभागाने रशिया आणि बेलारुसकडून होणार्या निर्णयावर बंदी घातली आहे. आम्ही युक्रेनच्या मदतीसाठी एकत्रीत आहोत. अमेरिकेकडून लागू करण्यात आलेले प्रतिबंध कायम राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी रशियाला देण्यात आलेल्या विशेष दर्जा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच मद्य आणि हिर्यांच्या आयातीवरही बंदी घातली आहे. जगभरातील ३०० हून अधिक कंपन्यांनी रशियातील आपला कारभार बंद केला आहे.
हेही वाचलं का?