

मुबंई ; पुढारी ऑनलाईन : महाविकास आघाडीतील १२ लोकांची यादी जाहीर करत यांच्यावर कारवाई होणार, असे ट्वीट करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती. दरम्यान मागच्या काही काळात महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी वेगवेगळ्या कारणातून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याचबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्यानंतर अनिल परब यांच्यावर कारवाई होणार, असे मत व्यक्त केले होते.
किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा ट्विट करत अनिल परबांना टार्गेट केले आहे. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे ट्वीट करत "अब अनिल परब का नंबर आयेगा" असे त्यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये दापोलीतील रिसॉर्टचे दोन फोटो शेअर केले आहेत.
अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा या सगळ्यांची चौकशी होणार. भारत सरकारने दापोलीतील न्यायालयात तक्रार दाखल केली असून, या याचिकेवरील सुनाणी ३० मार्च रोजी होणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट आणि बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे.अनिल परब यांचे बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्यांच्या बंगल्यावर येत्या काही दिवसांत कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.
हेही वाचलं का?