Russia Ukraine War : आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी | पुढारी

Russia Ukraine War : आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी

कीव्ह (युक्रेन) : पुढारी ऑनलाईन

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये (Russia Ukraine War) आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी एएनआय (ANI) शी बोलताना सांगितले की, युद्धादरम्यान हा विद्यार्थी पळण्याचा प्रयत्न करत होता. रशिया-युक्रेन दरम्यान झालेल्या गोळीबारात या विद्यार्थ्याला गोळी लागून तो जखमी झाला आहे. दरम्यान, त्याला कीव्ह शहरातील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आता निर्णायक वळणावर येवून ठेपले आहे. (Russia Ukraine War) युक्रेनची राजधानी कीव्‍हवर कब्‍जा मिळविण्‍यासाठी रशियाकडून मोठ्या प्रमाणात युक्रेनवर हल्ले होत आहेत. रशियन सैन्य युक्रेनमध्ये कहर करत आहे. आज रशियाने युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावरही मोठ्या प्रमाणात हल्ला केला असून, त्या प्लांटला आग लागली आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रशियाला अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ला थांबवण्याचे आवाहन केले.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (Russia Ukraine War) अनेक निष्पाप युक्रेनियन आणि परदेशी नागरिकांचे जीव जात आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या कामगिरीवर केंद्र सरकारने युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये विशेष दूत पाठवले आहेत. यामधील व्ही. के. सिंह हे एक मंत्री आहेत, त्यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button