चक्क माणसाच्या छातीत धडधडले डुकराचे हृदय; अमेरिकेत जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी | पुढारी

चक्क माणसाच्या छातीत धडधडले डुकराचे हृदय; अमेरिकेत जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

मेरीलँड (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील एका ५७ वर्षीय व्यक्तीला चक्क डुकराचे हृदय बसवण्यात आले आहे. एका मानवाच्या शरिरात डुकराचे हृदय प्रत्यारोपण करण्याची जगातील ही पहिल्या शस्त्रक्रिया (First heart transplant) आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे सदर व्यक्तीच्या छातीत गेली तीन दिवस डुकराचे हृदय धडधडत आहे. अमेरिकेतील यूनिवर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरमध्ये (University of Maryland Medical Center) ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

एका वृत्तानुसार, ज्या रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली त्याचे नाव डेव्ह बेनेट (Dave Bennett, 57) असे आहे. ते हृदयरोगाने त्रस्त होते. त्यांची वैद्यकीय स्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांना पारंपरिक हृदय प्रत्यारोपण अथवा कृत्रिम हृदय पंप बसविणे शक्य नव्हते. त्यांच्या शरिरात डुकराचे हृदय बसविण्याचा एकमेव पर्याय उरला होता. त्यासाठी पहिली प्रायोगिक तत्त्वावर शस्त्रक्रिया करण्यास त्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर डॉक्टरांनी जनुकीय उत्परिवर्तन डुकराचे हृदय (gene-edited pig) रोपण करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया तब्बल ९ तास चालली. डॉक्टरांनी त्यांच्या शरिरात १ वर्षाच्या २४० पाऊंड वजन असलेल्या डुकराचे हृदय बसवले. यामुळे आता बेनेट व्हेंटिलेटरशिवाय स्वत: श्वास घेत आहे. मला जगायचे आहे, असे डेव्ह बेनेट यांनी शस्त्रक्रियेपूर्वी म्हटले होते. आणि तसेच त्यांच्याबाबतीत घडले आहे. डेव्ह बेनेट यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी यूएस फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने ३१ डिसेंबर रोजी परवानगी दिली होती.

“हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. माझ्या वडिलांना याचीच गरज होती आणि आम्हाला जे हवे होते तेच मिळाल्यासारखे वाटते.” अशी प्रतिक्रिया बेनेट यांचा मुलगा डेव्हिड यांनी दिली आहे.

दरवर्षी लाखो लोकांना अवयव प्रत्यारोपणाची गरज…

प्राण्यांच्या अवयवांचा वापर करुन मानवी जीवन कसे वाचवायचे हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक दशके संशोधन करत आहेत. दरवर्षी लाखो लोक अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करत असतात. दाता मिळत नसल्याने त्यांना अनेक दिवस वेदना सोसाव्या लागतात. यामुळे अनेकांचा मृत्यूही होतो. डुकरांना माणसांसारखे अवयव असतात. जर ते अवयव प्रत्यारोपणात वापरता आले तर अनेक रुग्णांची प्रतीक्षा संपणार आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जय भीम चित्रपटातल्या गाण्याचं हे मराठी कव्हर सॉंग जरूर ऐका | Cover Song of Jai Bhim | Jay bhim movie

Back to top button