इम्रान खान यांच्याकडून भारताचं दुसऱ्यांदा कौतुक, अमेरिकेवर केला गंभीर आरोप

इम्रान खान यांच्याकडून भारताचं दुसऱ्यांदा कौतुक, अमेरिकेवर केला गंभीर आरोप
Published on
Updated on

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांचे सरकार अल्पमतात आलेले आहे. इम्रान खान सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्‍तावावर उद्या ३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. भारताचे परराष्ट्र धोरण हे त्यांच्या लोकांच्या हिताचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेच्या कथित हस्तक्षेपाबद्दल तीव्र निषेध नोंदवत पाकिस्तानने इस्लामाबादमधील एका वरिष्ठ अमेरिकन राजदुताला चौकशीसाठी बोलावले आहे. याच दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत भाष्य केले आहे.

दरम्यान, इम्रान खान यांचे सुमारे चार वर्षांचे सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने ( US State Department) फेटाळून लावला आहे. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे पालन केल्यामुळे त्यांना हटवण्यासाठी परदेशी षड्यंत्र रचल्याचा आरोप ६९ वर्षीय खान यांनी केला होता. खान यांनी शुक्रवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अमेरिकेचे प्रत्यक्ष नाव घेतले नाही. परंतु त्यांनी नमूद केले की, भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. कारण युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियावर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादले आहेत.

"मी ब्रिटीश परराष्ट्र सचिवांचे विधान वाचले. ते भारताला काहीही बोलू शकत नाहीत कारण भारताचे स्वतंत्र असे परराष्ट्र धोरण आहे. पाश्चिमात्य देशांना दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांना चुकीचे म्हणू शकत नाही, पण मग आम्ही काय आहोत?. दोष पाकिस्तानचा आहे. ही आमची चूक आहे. कोणताही देश जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याचा आदर केला जात नाही.", असे खान यांनी म्हटले आहे.

त्यानंतर त्यांनी भारताचे कौतुक करताना म्हटले आहे की, ते त्यांचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण जपतात. जे त्यांच्या लोकांवर केंद्रीत आहे. अलीकडील काही दिवसांत इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जाहीरपणे कौतुक करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी २१ मार्च रोजी, त्यांनी भारताचे कौतुक केले होते. देशातील लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी निर्बंध लादलेल्या रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इम्रान (Pakistan PM Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाला चौधरी आसिम नाजीर आणि मोहम्मद अस्लम भुटानी यांनी 'खुदा हाफिज' ठोकल्यानंतर एक मोठा हादरा खान सरकारला बसला आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या (पीटीआय) सरकारला असलेला पाठिंबा मागे घेत असल्याचे मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) या पक्षाने याआधी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे जाहीर केले आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले असून, इम्रान खान कधीही क्लीन बोल्ड होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : नागा बरोबर स्टंट करणे तरुणाला पडले महागात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news