

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला पराभव केला. या विजयाची चर्चा अजूनही होत आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीने केलेल्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारताने हा सामना ४ गडी राखून जिंकला. या सामन्यात माझ्याकडून चूक झाली असती तर, मी लगेचच निवृत्ती जाहीर केली असती, असा दावा टीम इंडियाच्या एका अनुभवी खेळाडूने केला आहे. (IND vs PAK)
रविचंद्रन अश्विन म्हणाला, 'जर मोहम्मद नवाजचा चेंडू वळून माझ्या पॅडवर आदळला असता, तर मी थेट ड्रेसिंग रूममध्ये गेलो असतो आणि ट्विटरवर लिहिले की, 'खूप खूप धन्यवाद, माझी क्रिकेटची कारकीर्द खूप चांगली झाली आणि तुम्हा सर्वांचे आभार.' भारताविरुद्धच्या या रोमांचक सामन्यात मोहम्मद नवाज पाकिस्तानसाठी शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला होता. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती. हार्दिक पांड्याला पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नवाजने बाद केले होते. (IND vs PAK)
यानंतर दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक आणि तिसऱ्या चेंडूवर कोहलीने दोन धावा घेतल्या. चौथा चेंडू नो-बॉल होता, ज्यावर कोहलीने षटकार मारला. आता तीन चेंडूत सहा धावा हव्या होत्या.त्यानंतर बायने तीन धावा काढल्या, पण पाचव्या चेंडूवर कार्तिक बाद झाला. भारताला विजयासाठी १ चेंडूत २ धावांची गरज असताना मोहम्मद नवाजने वाईड बॉल टाकून धावसंख्या बरोबरीत आणली. त्यानंतर आर. अश्विनने एक धाव घेत संघाला विजय मिळवून दिला होता.
हेही वाचा;