मुंबई : रस्त्यावर झोपलेल्या २ महिन्यांच्या बाळाचे अपहरण, जोडपे १२ तासांत जेरबंद | पुढारी

मुंबई : रस्त्यावर झोपलेल्या २ महिन्यांच्या बाळाचे अपहरण, जोडपे १२ तासांत जेरबंद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील सेंट झेवियर्स शाळेजवळच्या रस्त्यावर आई आपल्या २ महिन्यांच्या अर्भकाला घेऊन झोपली होती. यावेळी बाळाचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर अर्भकाच्या आईच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. यामधील अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी अंतर्गत कलम ३६३ (अपहरण) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली. अवघ्या १२ तासांत अपहरण करणाऱ्या या जोडप्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
CCTV व्हिज्युअल फुटेजनुसार, पोलिसांनी वेगवेगळ्या आठ टीम तयार करत शोधमोहिम सुरू केली. यानंतर अपहरण्याच्या गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव मोहम्मद हनीफ शेख असे आहे. यानंतर अपहरण झालेल्या दोन महिन्याच्या अर्भकाला त्याच्या कुटूंबियांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

पोलीस पथकाने योग्य ती खातरजमा करून संशयित आरोपीस ताब्यात घेत चौकशी केली. यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी आणि त्याच्या पत्नीने स्पष्ट केले की, दोघांनी आपापसात संगनमत करून विक्री करण्याच्या उद्देशानेच या बालिकेचे अपहरण केले होते.

Back to top button