शिवसेनेची डोंबिवली मध्यवर्ती शाखा अखेर बाळासाहेबांच्या शिवसेनेने घेतली ताब्यात! (Video) | पुढारी

शिवसेनेची डोंबिवली मध्यवर्ती शाखा अखेर बाळासाहेबांच्या शिवसेनेने घेतली ताब्यात! (Video)

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेची डोंबिवली मध्यवर्ती शाखा बाळासाहेबांच्या शिवसेनेने अखेर ताब्यात घेतली. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये या शाखेच्या ताब्यावरून वाद सुरू होता. शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी ही शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे.

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटांमध्ये डोंबिवलीची मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची? यावरून दोन महिन्यांपूर्वी मोठया प्रमाणात वादावादी झाली होती. त्यानंतर या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले. गुरुवारी सकाळी दोन्ही गटातील हा वाद पुन्हा उफाळला. ही शाखा आमचीच आहे, असा दावा बाळासाहेबांची शिवसेनेकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या आधीपासूनच या शाखेच्या जागेची विक्री कराण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले असून बाळासाहेबांच्या शिवसेनेने ही शाखा अखेर ताब्यात घेतली आहे, असे शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी सांगितले. यावेळी शिंदे गटातील नगरसेवक महेश पाटील, रवी पाटील, दीपेश म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, जनार्दन म्हात्रे आदी नगरसेवक शाखेत येऊन बसलेले निदर्शनास आले.

हेही वाचा :

Back to top button