IND VS BAN Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने सांगितले भारताच्‍या पराभवाचे कारण,”वॉशिंग्‍टन सुंदरने…”

IND VS BAN Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने सांगितले भारताच्‍या पराभवाचे कारण,”वॉशिंग्‍टन सुंदरने…”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्‍ध बांगलादेशमधील तीन सामन्‍याच्‍या वनडे मालिकेतील पहिला सामना मिरपूर झाला. १८७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने १३६ धावांत ९ विकेट्स गमावल्या होत्या. विजय सोपा असताना तो आपल्‍या सुमार कामगिरीमुळे अवघड करायचाटीम इंडियाचा लौकीक या सामन्यात कायम राहिला. जिंकणारा सामना भारताने गमावला कसा याचे उत्तर क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने दिले आहे. ( IND VS BAN Dinesh Karthik )

187 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने 136 धावांत नऊ विकेट गमावल्या होत्या. यावेळी भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण भारतीय खेळाडूंनी महत्त्वाच्या वेळी दोन झेल सोडले. यष्टिरक्षक केएल राहुलने मेहदी हसन मिराजचा महत्त्वाचा झेल सोडला. त्यावेळी चेंडू अगदी जवळ असताना वॉशिंग्टन सुंदरने झेल घेण्य़ाचा प्रयत्नही केला नाही. भारतीय खेळाडूंनी महत्त्‍वाच्‍या वेळी दोन झेल सोडले आणि बांगलादेशने शेवटच्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

IND VS BAN Dinesh Karthik : सुंदरने कॅच पकडण्याचा प्रयत्न का केला नाही?

भारताच्या पराभवाबाबत एका वेबसाईटशी बोलताना दिनेश कार्तिक म्‍हणाला, " वॉशिंग्‍टन सुंदर याने कॅच पकडण्याचा प्रयत्न का केला नाही, हे समजण्यापलीकडचे आहे. केएल राहुलचा झेल सुटला आणि सुंदर झेल घ्यायला गेला नाही. तो का आला नाही हे माहित नाही. हे  डोळ्यावर पडलेल्‍या प्रकाशामुळै झालं की अन्‍य कशामुळै याबाबत काही माहिती नाही; पण त्याने हवेतील चेंडू पाहिला असेल तर त्याने झेल घ्यायला हवा होता. "

बांगलादेशच्या मेंहदी हसन मिराजला शेवटच्या षटकात दोन जीवदान मिळाल्याने रोहित शर्मा संतापला होता. शेवटी मेंहदी हसनने बांगलादेशला विजय मिळवून दिला. केएल राहुलने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कबूल केले की, भारताने शेवटी झेल पकडण्याच्या दोन संधी गमावल्या. तो म्हणाला की, "हे क्रिकेट आहे. तुमच्याकडून अनपेक्षितपणे अपेक्षा ठेवाव्या लागतील. जोपर्यंत क्रिकेट खेळले जाते, तोपर्यंत असे प्रकार घडत राहतात. त्यांनी शेवटपर्यंत खूप चांगली लढत दिली. काही झेल सुटले आणि मेहदीची खेळी आमच्या पराभवाचे कारण ठरली" असेही त्याने स्पष्ट केले.

बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ काही गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. एकदिवसीय मालिकेत टिकण्यासाठी भारताला दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news