Football Legend Pele : मी स्ट्राँग आहे.. तुम्ही सकारात्मक राहा..! | पुढारी

Football Legend Pele : मी स्ट्राँग आहे.. तुम्ही सकारात्मक राहा..!

साओ पाऊलो, वृत्तसंस्था : मी स्वत: स्ट्राँग आहे. आपण सर्वांनी शांत आणि सकारात्मक राहा, असा संदेश ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले (Football Legend Pele) यांनी आपल्या चाहत्यांना दिला आहे. पेले हे पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त असून त्यांनी केमोथेरपी उपचारांना प्रतिसाद देण्याचे बंद केला असल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून पेले यांनी हा संदेश दिला आहे.

ब्राझीलसाठी तीन वेळा विश्वचषक जिंकणारे पेले यांच्यावर साओ पाऊलो येथील अल्बर्ट आईन्स्टाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पेले यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, माझ्या मित्रांनो, मी सर्वांना शांत आणि सकारात्मक पाहू इछितो. माझी आकांक्षा मजवूत आहे. योग्य उपचार सुरू आहेत. (Football Legend Pele)

Back to top button