IND VS BAN 1st ODI : याला म्हणतात ‘विराट’ कॅच! पाहाल तर थक्क व्हाल…(Video) | पुढारी

IND VS BAN 1st ODI : याला म्हणतात 'विराट' कॅच! पाहाल तर थक्क व्हाल...(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि.४) शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत १८६ धावा केल्या आणि बांग्लादेश समोर १८७ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय गोलंदाजांच्‍या भेदक मार्‍यासमोर (IND VS BAN 1st ODI) बांगलादेशचा डाव गडगडला मात्र बांगलादेशच्‍या अखेरच्‍या जोडीने भारताच्‍या विजयाचा घास हिरावला. या सामन्‍यात विराट कोहली सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करताना दिसला. त्‍याने शाकिब अल हसनचा घेतलेला झेल अविस्‍मरणीय ठरला.

शाकिब अल हसन याने उत्‍कृष्‍ट क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवत विराटला बाद केले होते. त्याचा बदला घेत शाकिब अल हसन तंबूत पाठवण्यासाठी कोहलीने हवेत झेपावत झेल पकडला. हा या वर्षातला हा सर्वोकृष्ट झेल ठरू शकतो, अशा प्रतिक्रिया विराटचे चाहते व्‍यक्‍त करत आहेत.  (IND VS BAN 1st ODI)

विराट कोहलीचा झेल घेतलेला हा सोशल व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. विराट जगातील सर्वोकृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. शाकिबचा त्‍याने घेतलेला झेल पाहून चाहतेही थक्क झाले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट फलंदाजी करताना चांगली कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात तो फक्त ९ धावा करू शकला.

भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी (IND VS BAN 1st ODI)

टी २० विश्वचषकानंतरच्या बांगलादेश दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, के.एल.राहुल आणि विराट कोहली यांना आराम देण्यात आला होता. विराट कोहली आणि रोहित शर्मा या सामन्यात चांगली कामगिरी करू शकले नाहीत. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला १८६ धावाच करता आल्या. के.एल.राहुल शिवाय कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. के.एल. राहुलने ७३ धावा केल्या. (IND VS BAN 1st ODI)

हेही वाचलंत का?

Back to top button