

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे " व्हायब्रंट महाएक्सपो २०२२" (Vibrant MahaExpo) या प्रदर्शनाचे १५ ते १८ एप्रिल या कालावधीत शाहूपुरी जिमखाना मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन उद्या १५ एप्रिलरोजी सकाळी १२ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यांची असणार आहे. प्रदर्शनाचे यावर्षीचे हे नववे वर्ष आहे.
(Vibrant MahaExpo) मेक इन इंडियाच्या धर्तीवर 'मेक इन कोल्हापूर' या धर्तीवरील हे प्रदर्शन असून या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे क्रिएटिव्हज एक्झिबिशन अँन्ड इव्हेट व हाऊस ऑफ इव्हेंट या संस्थेने केले आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये देश विदेशातील नामांकित कार्पोरेट कंपन्यांचे स्टॉल्स व त्यांच्या मोठ मोठ्या मशिनरी व उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्वच उत्पादनांचे एकूण १०० च्या आसपास कंपन्यांचे स्टॉल्स याठिकाणी असणार आहेत. कोल्हापूरमध्ये प्रथमच जर्मन हँगरमध्ये संपूर्ण वातानुकूलित हे प्रदर्शन होत आहे.
(Vibrant MahaExpo) स्टार्टपसाठी नवीन उद्योजकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या उद्योजकांना मिळणार आहे. या प्रदर्शनासाठी शाहूपुरी जिमखाना मैदान येथे भव्य मंडप उभा करण्यात आला आहे. एसीयुक्त कॉन्फरन्स हॉल व १०० स्टॉल धारकांचे स्टॉल असल्याने तशी मंडप उभारणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचा उपयोग कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, कोकणसह राज्यातील विविध ठिकाणीच्या उद्योजकांना होणार आहे. याचबरोबर इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात दररोज सेमिनार ही होणार आहेत १५ रोजी सरकारी योजनांची माहिती, १६ रोजी आयात निर्यात या क्षेत्रातील संधीची माहिती, १७ रोजी आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापार उद्योगातील वापर या विषयावर सायंकाळी ५ वाजता सेमिनार व मार्गदर्शन होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसात या वेळेत दिवसभर सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.
कोल्हापूर शहराचा विकास झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. नवीन उद्योग आता येऊ लागले आहेत. म्हणूनच कोल्हापूरसह आजूबाजूच्या उद्योजकांना नव्या तंत्रज्ञानाची नव्या उद्योगांची माहिती होणे गरजेचे आहे. शिवाय कोल्हापूरची ओळख ही सर्वच क्षेत्राच्या माध्यमातून वाढू लागली आहे. नव्या उद्योगांना चालना मिळावी. व कोल्हापूरची ओळख ही सर्व क्षेत्राच्या माध्यमातून व्हावी, यासाठीच हे प्रदर्शन नवी चालना व मार्गदर्शन देणारे ठरणार आहे.
या प्रदर्शनासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर एमआयडीसी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशन,कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकलंगले, डेस्टिनेशन कोल्हापूर यांचे सहकार्य मिळाले आहे. तर प्रदर्शनाचे गोल्ड स्पॉन्सर हे रिलायन्स पॉलिमर्स व रिमसा क्रेन्स प्रा.लि. हे आहेत.
या प्रदर्शनात वेगवेगळ्या कंपन्यांची पॅकेजिंग प्रॉडक्ट मशिनरी, कटिंग टूल मॅन्युफॅक्चरर, सेंटरलाइस कुलिंग सिस्टिम, सीएनसी लेथ मशीन मॅन्युफॅक्चरर, फाउंड्री केमिकल मॅन्युफॅक्चरर, व्हॅपिंग मशीन, इंडस्ट्रियल पाईप, सोलर, मल्चिंग फिल्मस, इंडस्ट्रियल बॉक्सेस, एअर कॉम्प्रेसर, केमिकल इंजीनियरिंग एनालिसिस, इलेक्ट्रॉनिक अँड इकॉनोमिकल स्केल इलेक्ट्रॉनिक वेट मशीन, आदींसह अन्य उत्पादने पहावयास मिळणार आहेत.
उद्योग क्षेत्राशी निगडित असलेल्या या प्रदर्शनामध्ये राज्यातील कोल्हापूरसह देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.यामध्ये गोदरेज अँड बॉईसी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि, ओसवाल ब्रदर्स, सेफसील्स मशीन प्रायव्हेट लिमिटेड ,इकविनोकस एन्व्हायरमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,इंगर सील लिमिटेड,ब्रिस्क इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, न्यूमीनल पॉवर, अंजनी ट्यूबज इंडिया, खतेद्र मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, रामासा क्रेन्स प्रायव्हेट लिमिटेड, यंत्रा न्यूमॅटिक अँड इक्विपमेंट, एमएनके बिल्डिंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, पॅकनेक इंडस्ट्रीज, फॅब इंडिया इंजिनियर्स, एएस अँग्री एक्वा एलएलपी, अलटेक अँलॉइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ऍक्युशार्प कटिंग टूल्स प्रायव्हेट लिमिटेड, सुपर मीटिंग एशियन एस ई कुपरं मॅटिंग, एशियन मशीन टूल प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचलंत का ?