सोलापूर : वही, पेनाच्या सहाय्याने साकारली डॉ. बाबासाहेबांची भव्य प्रतिकृती | पुढारी

सोलापूर : वही, पेनाच्या सहाय्याने साकारली डॉ. बाबासाहेबांची भव्य प्रतिकृती

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही आणि पेन याच्या मदतीने 20 बाय 35 फुटाची भव्य अनोखी प्रतिकृती साकारून महामानवास अभिवादन करण्यात आले आहे. सोलापूर येथील सम्राट अशोक शिक्षण संकुलाच्या वतीने स्पर्शरंग कला परिवाराच्या सहकार्याने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

सम्राट अशोक शिक्षण संकुल अन्नाच्या भव्य प्रांगणामध्ये गेल्या दोन दिवसापासून स्पर्श रंग कला परिवार ही प्रतिकृती साकारत आहे. विश्वविक्रमी चित्रकार विपुल मिरजकर यांनी शाळेतील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून 1131 वही व पेन यांच्या मदतीने ही प्रतिमा तयार केली आहे.

या प्रतिकृतीत वापरलेले वही व पेन हे शाळेतील विद्यार्थ्यांना परत देण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून ज्ञानरूपी महामानवास शाळेच्या वतीने अणोखे अभिवादन करण्यात आले आहे. समाजामध्ये क्रांती ही शिक्षणानेच होते, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसारच सी. एम. बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button