Ethanol Prodution : देशांतर्गत इथेनॉल उत्पादनात वाढ | पुढारी

Ethanol Prodution : देशांतर्गत इथेनॉल उत्पादनात वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या इथेनॉल उत्पादनात वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये असलेले १७३ कोटी लिटरचे उत्पादन २०२०-२१ मध्ये ३०२ कोटी लिटरपर्यंत वाढल्याची माहिती ग्राहक व्यवहार व अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिली आहे. इथेनॉल मिश्रण ६२% ने वाढले असून २०१९-२० मधील ५% वरून २०२०-२१ मध्ये ८.१% पर्यंत गेले आहे. (Ethanol Prodution)

३० सप्टेंबर २०२१ रोजी देशातील इथेनॉलची उत्पादन क्षमता ८२५ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे जी २०२१-२२ मध्ये १०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी पुरेशी असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

३१ मार्च २०२२ पर्यंत ही उत्पादन क्षमता ८४९ कोटी लिटर इतकी वाढली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात, विभागाच्या इथेनॉल व्याज माफी योजनेअंतर्गत, नोडल बँक नाबार्डला १६० कोटी रुपये जारी करण्यात आले. २०२१-२२ पर्यंत या योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेली एकत्रित रक्कम ३६० कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. (Ethanol Prodution)

दरम्यान,पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएव्हाय) आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा,२०१३ (एनएफएसए) अंतर्गत किमान हमी भावानुसार खरेदी तसेच अन्नधान्याच्या वेगवान वितरणासाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य सरकारांना खाद्यान्न अनुदानासाठी डीपीसी (विकेंद्रित प्रापण व्यवस्था) आणि बिगर डीपीसी साठी २ लाख ९४ हजार ७१८ कोटी रुपये जारी केले.

हे अनुदान २०२२-२१ मध्ये जारी केलेल्या खाद्यान्न अनुदानाच्या १४०% आणि २०१९-२० मध्ये जारी केलेल्या खाद्यान्न अनुदानाच्या सुमारे २६७% एवढे आहे.

योजनांचा लाभ समाजातील विविध असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचाण्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने अनुसूचित जातींसाठी सुमारे २४ हजार कोटी, अनुसूचित जमातींसाठी १२ हजार कोटी आणि ईशान्य प्रदेशासाठी ४०० कोटींहून अधिक निधी जारी केल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button