भावना मेनन : माझ्या स्वाभिमानाचे आणि आत्मसन्मानाचे तुकडे तुकडे झाले
पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री भावना मेननने आपल्यावर झालेल्या अत्याचार आणि त्यानंतर आलेल्या संकटांविषयी उघडपणे सांगितले. भावना मेनन एका शोमध्ये ८ मार्च महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना तिने उत्तरे दिली. भावना म्हणाली की, तिला सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. काहींनी माझ्यावर आरोप केले. लोक म्हणायचे की मी खोटं बोलत आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी मी असे आरोप करत आहे. मल्याळम अभिीनेत्री भावनाने अभिनेता दिलीपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ती म्हणाली की, माझ्या स्वाभिमानाचे आणि आत्मसन्मानाचे तुकडे तुकडे करण्यात आले. मी उद्ध्वस्त झाले. आता मला माझा सन्मान परत मिळवायचाय. तिने ही लढाई सुरुच ठेवणार असल्याचे म्हटलंय.
एका शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने आपली व्यथा मांडली. तिने आपला परिवार, मित्र आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या जनतेला अन्यायाविरोधात लढण्यासाठीचं श्रेय दिलं.
भावना म्हणते, "मी आतादेखील घाबरलेली आहे. मला नाही माहित की सिस्टिम कसं काम करतं. माझ्या आतमध्ये भीती आहे. मी कधी-कधी दु:खी, क्रोधित होते. पण, मला लढायचंय. मला पाठिंबा देणारे खूप आहेत. पण तरीही मी एकटेपणा अनुभवते. २०२० मध्ये मी १५ दिवस मी सकाळ ते सायंकाळपर्यंत कोर्टात राहिले. त्यावेळी प्रत्येक क्षण मी कोर्टात घालवले. आणि प्रत्येकवेळी मी हे सिध्द करण्याचा प्रयत्न करत राहते की, मी निर्दोष आहे. वकील मला प्रश्न विचारत राहिले. सकाळ ते सायंकाळपर्यंत त्या घटनेला पाहत राहिले. तेव्हा मला वाटलं होतं की, मी एकटी पडली आहे.
सोशल मीडिया पोस्टवर लिहिली होती पोस्ट
मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीतील भावना हे नाव प्रसिध्द आहे. तिने जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने पाच वर्षे जुन्या अपहरण आणि लैंगिक शोषणाविषयी खुलासा केला होता. तिने लिहिलं होतं की-तिचा आवाज कशाप्रकारे दाबण्याचा प्रयत्न केला गेला. तिने हेदेखील लिहिलं की ती न्यायासाठी आपली लढाई सुरूचं ठेवेल.
भावनाच्या अपहरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात अभिनेता दिलीपचं नावदेखील जोडलं गेलं आहे. केरळ पोलिसांनी या प्रकरणी अभिनेता दिलीप विरोधात केस दाखल केलीय.

