HBD Richa Chadha: इंटर्नशिपला मुलाखतीसाठी अभय देओलने दिलेला नकार

रिचा चड्ढा
रिचा चड्ढा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ओए लकी लकी ओये' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी रिचा चढ्ढा (HBD Richa Chadha) आज एक प्रतिभावान अभिनेत्री बनली आहे. अमृतसरमध्ये जन्मलेली रिचा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या उत्कृष्ट अभिनय शैलीसाठी देखील ओळखली जाते. आज १८ डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया, तुम्हाला माहिती नसलेल्या या गोष्टी. (HBD Richa Chadha)

१ रिचाचा जन्म १८ डिसेंबर, १९८६ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. दोन वर्षांची असताना रिचा चढ्ढा आपल्या कुटुंबासह अमृतसरहून दिल्लीला स्थलांतरित झाली.

२- चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी रिचा जेन्ट्स फॅशन मॅगझिनमध्ये इंटर्नशिप करत असे. तिने इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर थिएटर आणि मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावलं आहे.

३- रिपोर्ट्सनुसार, तिने अभय देओलशी तिच्या इंटर्नशिपदरम्यान एका मुलाखतीसाठी संपर्क साधला होता. मात्र त्याने तिला मुलाखत देण्यास नकार दिला. नंतर तिने अभय देओलसोबतच 'ओए लकी लकी ओए' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

४- तिच्या कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रिचा तिच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेशी जुळणारे परफ्यूम लावते. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये तिने चमेलीच्या फुलांनी बनवलेला मातीचा परफ्यूम लावला होता. त्याचप्रमाणे 'फुक्रे'च्या शूटिंगदरम्यान तिने तीव्र वास असणारा परफ्यूम लावला होता. तिने राम लीलासाठी 'म्युझिक' नावाचा परफ्यूम वापरला आणि तिच्या आगामी 'कॅबरे' चित्रपटासाठी व्हरवीन नावाचा परफ्यूम तिने निवडला. यामध्ये ती एका डान्सरच्या भूमिकेत आहे.

५- 'मसान' मधील तिच्या अभिनयाने प्रसिद्धी मिळवलेल्या रिचाने प्रसिद्ध होण्यापूर्वी कल्की कोचलिन, गुलशन देवैया आणि रणवीर सिंग यांच्यासोबत थिएटर वर्कशॉप्समध्ये भाग घेतला होता.

६ – अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून रिचाला चित्रपटांमध्ये मोठे यश मिळाले. या चित्रपटात तिने 'नगमा खातून' ही व्यक्तिरेखा साकारली होती. रिचाला 'गँग्स ऑफ वासेपूर'साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक पुरस्कारही मिळाला होता.

८-'फुक्रे' मध्ये तिचा बोल्ड अभिनय होता. ऋचाचा चित्रपट 'सेक्शन ३७५' रिलीज झाला. या चित्रपटामध्ये ती अक्षय खन्नासोबत दिसली होती.

९- ऋचा चड्ढा 'मिर्जापुर' फेम अभिनेते अली फजलसोबत रिलेशनशीपमध्ये होती. दोघे आता लग्नबंधनात अडकले आहेत.


Ali Fazal Ali Fazal 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news