

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता जॉन अब्राहमने केवळ आपल्या कामाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावले नाही तर तो त्याच्या उत्कृष्ट फिटनेस आणि सिक्स पॅक ॲब्जसाठी देखील ओळखला जातो. जॉन अब्राहमचा जन्म १७ डिसेंबर, १९७२ रोजी झाला. आज जॉन त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. (HBD John Abraham) मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या जॉनची सुरुवातीपासूनच अॅक्शन हिरोची इमेज होती. कॉमिक ते रोमँटिक हिरोपर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. जॉनला त्याचा पहिला चित्रपट कसा मिळाला आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया. (HBD John Abraham)
चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी जॉन अब्राहम मॉडेलिंग करायचा. एका अॅड एजन्सीशी संबंधित तो काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, जॉनला या एजन्सीकडून जवळपास १३ हजार ८०० रुपये मिळत होते. चित्रपटांपूर्वी त्याने म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले होते. मॉडेलिंगच्या दुनियेत ठसा उमटवताना महेश भट्ट यांनी जॉन अब्राहमला त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
वास्तविक त्यावेळी महेश भट्ट त्यांच्या 'जिस्म' चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. नवा अभिनेता व्यक्तिमत्त्वात संजय दत्तसारखा असावा, अशी त्यांची अट होती आणि महेश भट्टचा हा शोध पला. त्यांनी जॉनला सांगितले की त्याला ज्या चित्रपटात घ्यायचे आहे तो ऑफबीट विषय आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षक ठरवतील की, त्यांना हा चित्रपट आवडतो की नाही.
जॉन अब्राहमने महेश भट्टची ही अट मान्य केली आणि २००३ मध्ये 'जिस्म' चित्रपटातून डेब्यू केला. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. १७ ते १८ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत जॉनने अभिनेता म्हणून सुमारे ४० चित्रपटांमध्ये आणि निर्माता म्हणून सात चित्रपटांमध्ये काम केले आहे.
जॉन अब्राहमला तुम्ही अनेकदा बाईकवर पोज देताना पाहिलं असेल. खरंतर जॉन अब्राहमला बाईक्सचा खूप शौक आहे आणि त्याच्याकडे बाईक्सचंही खूप छान कलेक्शन आहे.