HBD Jackie Shroff : मी चाळीत असतो तर माझ्या आईचे प्राण वाचले असते

HBD Jackie Shroff : मी चाळीत असतो तर माझ्या आईचे प्राण वाचले असते
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऐंशीच्या दशकात एकीकडे अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा होती तर काही सुपरस्टार्सदेखील आपल्या स्टाईलने सर्वांना वेड लावलं होतं. त्यावेळी अनेक स्टार्सची नावे चित्रपट इंडस्ट्रीत चमकत होतं. त्यापैकी एक होते- जॅकी श्रॉफ. (Jackie Shroff ) जॅकी श्रॉफचे फॅन्स तर त्यांच्यासाठी वेडे व्हायचे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असायचे. इतकंच नाही तर निर्माते-दिग्दर्शकदेखील त्याच्या घरासमोर आपला चित्रपट साईन करण्यासाठी लाईन लावायचे. १ फेब्रुवारी म्हणजेच आज अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. या खास औचित्याने आम्ही आपणांस जॅकी श्रॉफ यांच्याविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत.

जॅकीचा जन्म १ फेब्रुवारी, १९५७ रोजी वालकेश्वर, मुंबईतील तीन बत्ती भागात झाला. त्यांचं खरं नाव जय किशन श्रॉफ असं आहे. त्यांनी चित्रपट 'स्वामी दादा'मधून चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. 'हीरो' चित्रपटाने जॅकी श्रॉफ यांना स्‍टार केले. दिग्दर्शक सुभाष घई दिग्दर्शित चित्रपट 'हीरो' दरम्यान, अभिनेत्याचं नाव बदलून जॅकी श्रॉफ करण्यात आलं होतं. लोक त्यांना 'जग्गू दादा' नावानेही ओळखायचे.

'हीरो' चित्रपटातून लाईमलाईटमध्ये आल्यानंतर जॅकी श्रॉफचे लाखो चाहते होते. निर्माते-दिग्दर्शकांना वाटायचं की, जॅकीने त्यांचा चित्रपट साईन करावा. यासाठी मोठे-मोठे दिग्दर्शक त्याच्या घरी जायचे. असं म्हटलं जातं की, कधी कधी- निर्माते टॉयलेटच्या बाहेर उभे राहून जॅकी यांची प्रतीक्षा करायचे.

जॅकी यांनी गरिबी आणि आर्थिक तंगी पाहिलीय. त्यामुले स्टारडम मिळाल्यानंतरदेखील ते चाळीत राहायचे. चित्रपट 'हीरो' हिट झाल्यानंतरदेखील त्यांनी चाळीत राहायचं सोडून दिलं नाही. त्यांना आपल्‍या चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांना चाळीत जावं लागायचं. विधु विनोद चोप्रा आणि महेश भट्ट यासारखे मोठे दिग्दर्शकदेखील जॅकीला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी त्यांच्या घरी जायचे.

…तर आईला वाचवता आलं असतं

एका मुलाखतीत जॅकी यांनी सांगितलं होतं की, चाळीत आम्ही एकत्र राहायचो. त्यामुळे सर्व लोक डोळ्यांसमोर असायचे. पण, फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर सर्वांच्या खोल्या वेगवेगळ्या होत्या. आईदेखील एका खोलीत झोपली होती. आम्ही दुसऱ्या खोलीत होतो. दुसऱ्या दिवशी आई जग सोडून गेली होती. पण, चाळीत राहिलो असतो, तर मी आईच्या जवळ असतो. तिला मला वाचवता आलं असतं.

जॅकीने जवळपास १५० चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  त्यांनी १९८७ मध्ये आयशा हिच्‍याशी लव्ह मॅरिज केलं. त्यांना  टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ अशी मुले  आहेत. टायगरने  बाॅलीवूडमध्‍ये स्‍वत:चे स्‍थान निर्माण केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news