देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांच्या खाली ! पण मृत्यूंची वाढ चिंताजनक

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांच्या खाली ! पण मृत्यूंची वाढ चिंताजनक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असली, तरी मृत्यूची वाढ चिंताजनक आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे देशात काल प्रथमच दोन लाखांच्या खाली बाधित सापडले.

देशात गेल्या २४ तासात १ लाख ६७ हजार ५९ बाधित झाले आहेत, तर १ हजार १९२ जणांनी आपला जीव गमावला. देशात मागील २४ तासात २ लाख ५४ हजार ७६ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

देशात आजघडीला १७ लाख ४३ हजार ५९ ॲक्टीव्ह केसेस आहेत. देशातील डेली पॉझिटिव्हीटी रेट 11.69% वर आला आहे. आजवर देशात 1,66,68,48,204 जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर १५.७७% आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर १५.७५% नोंदवण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दैनंदिन ३ लाखांहून कमी कोरानाबाधित आढळत आहेत. २४ जानेवारीला २ लाख ५५ हजार ८७४ कोरोनाबाधित आढळले होते. यादिवसानंतर सातत्याने दैनंदिन कोरोनबाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत लसीचे १६६ कोटी ३ लाख ९६ हजार २७७ डोस लावण्यात आले आहेत.रविवारी दिवसभरात २८ लाखांहून अधिक डोस लावण्यात आले.

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता खबरदारी म्हणून आतापर्यंत १.१८ कोटी बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.देशातील १८ हून अधिक वयोगटातील ७५% नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १६४ कोटी ५९ लाख ६९ हजार ५२५ डोस पैकी १२ कोटी ३८ लाख ३५ हजार ५११ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news