वीज मंत्री निलेश काब्राल यांचेआव्हान दिल्लीच्या वीज मंत्र्यांनी स्वीकारले

वीज मंत्री निलेश काब्राल यांचेआव्हान दिल्लीच्या वीज मंत्र्यांनी स्वीकारले
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : वीज मंत्री निलेश काब्राल यांनी केलेले आव्‍हान दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी स्वीकारले आहे. वीज मंत्री निलेश काब्राल यांनी गेल्या आठवड्यात वीज चर्चेसाठी दिलेले आमंत्रण आपचे नेते तथा दिल्लीचे आमदार राघव चड्ढा यांनी सोमवारी स्वीकारले होते.

अधिक वाचा 

जैन यांनी ट्विट संदेशात म्हटले, की 'निलेश बाबू, तुम्ही दिल्लीच्या वीज मंत्र्यांसोबत आम आदमी पक्षाच्या विनामूल्य व २४ तास मोफत वीजेसंदर्भात चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे आपल्याला समजले. आपण तुमचे आव्हान स्वीकारतो.

अधिक वाचा 

या रविवारी मी गोव्यात येत आहे. रविवारी दुपारी ३ वाजताची वेळ तुमच्यासाठी चर्चेस ठीक असावी, अशी अपेक्षा आहे. तिथेच भेटू', असेही मंत्री जैन यांनी म्हटले आहे.

मंत्री  काब्राल यांनी गेल्या आठवड्यात वीज चर्चेसाठी दिलेले आमंत्रण आपचे नेते तथा दिल्लीचे आमदार राघव चड्ढा यांनी सोमवारी स्वीकारले होते. मात्र, निलेश काब्राल यांनी चड्ढा यांच्याशी नव्हे तर दिल्लीच्या वीज मंत्र्यांशीच चर्चा करण्याचा आग्रह धरला होता.

चड्ढा यांनी सोमवारी ट्विट केले होते, की 'निलेश बाबू, दिल्ली सरकारसोबत चर्चा करण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली, हे पाहून मला आनंद झाला. आपण पुन्हा एकदा तुमचे आव्हान स्वीकारतो. आपण गेल्या वेळेप्रमाणे परत चर्चेतून माघार घेणार नाही, अशी आशा करतो. कृपया तारीख, वेळ, ठिकाण सांगा आपण तिथे पोहचेन. गोमंतकीयांना शासकीय विषयावर चर्चा झालेली पहायची आहे, असेही त्‍यांनी नमूद केलं होते.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ :खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news