गोवा कार्निव्हल : म्हापशात उद्यापासून कार्निव्हलची धूम मिरवणुकीचे 1 मार्चला आयोजन

Goa Carnival Coming Soon...
Goa Carnival Coming Soon...
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात फेब्रुवारीच्या अखेरच कार्निव्हलची धूम पाहायला मिळणार असून, 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान, म्हापशातही कार्निव्हलची धूम असणार आहे. 1 मार्चला म्हापशात कार्निव्हल मिरवणूक असेल, गोवा सरकारचे पर्यटन खाते याचे प्रायोजक आहेत.

1 मार्चला सायंकाळी 4 वाजता ओल्ड आझिलोकडून या मिरवणुकीस सुरुवात होईल. माजी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक फिन्टन डिसोझा हे मिरवणुकीला हिरवा झेंडा दाखवतील. या चार दिवसांच्या कार्निव्हल महोत्सवानिमित्त श्रीबोडगेश्वर मंदिरासमोर प्रांगणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असेल, अशी माहिती मुख्याधिकारी सीताराम सावळ यांनी दिली. म्हापसा पालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक मायकल कारास्को उपस्थित होते.

आचारसंहितेमुळे यंदा कार्निव्हल कमिटीमध्ये मुख्याधिकारी, लेखाधिकारी असतील. त्यांना या शहराचे नागरिक या नात्याने कार्यक्रमाच्या आयोजनास आम्ही मदत करीत असल्याची माहिती मायकल कारास्को यांनी दिली. बोडगिणी येथे सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. 26 रोजी डीजे संगीत, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, बँड स्टील असेल. 27 रोजी, डीजे संगीत, वेस्टन नृत्य स्पर्धा, लोकनृत्य असेल. 28 रोजी, डिजे संगीत, बॉलिवूड नृत्य असेल. 1 रोजी कार्निव्हल परेड, बँड शो व त्यानंतर बक्षीस वितरण असेल. या समितीच्या अध्यक्षपदी सीताराम सावळ, सचिवपदी सुबराज कानेकर व खजिनदारपदी स्मिता फळदेसाई या आहेत.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news