World Tourism Day : जगभरातील पर्यटकांची गोव्यालाच पसंती | पुढारी

World Tourism Day : जगभरातील पर्यटकांची गोव्यालाच पसंती

पणजी; औदुंबर शिंदे : संपूर्ण जगाचे लक्ष गोव्यातील पर्यटनाकडे लागून राहिले आहे. कोरोना काळ संपल्यानंतर जागतिक पर्यटकांची (World Tourism Day) पहिली पसंती आता गोवाच आहे. सिंगापूर व हॉंगकॉंग सारख्या फ्री पोर्ट पर्यटनाचा दर्जा गोव्याला मिळावा, यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, त्याला प्रखर विरोध करण्यात आला.

संबंधित बातम्या : 

गोव्यासारख्या लहान प्रदेशाला फ्री पोर्ट योग्य नसून फ्री पोर्टच्या अधिक तर सवलती गोव्यात आहेत. त्यामुळे गोव्याला फ्री पोर्ट नाही मात्र, जागतिक पर्यटनाचा (World Tourism Day) दर्जा प्राप्त झाला आहे. असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. सध्या गोव्याला मॅरेज डेस्टिनेशन म्हणून जगभर प्राधान्य दिले जात आहे. लग्न करायचे तर ते गोव्यातच असे विदेशी लोकांना वाटते. त्याचबरोबर देशातील बड्या उद्योगपतींनाही गोव्याचे आकर्षण आहे. येथील खानपान आदरातिथ्य करण्याची पद्धती पार्ट्या, नाईटलाईफ पाहता सुट्टी घालवण्यासाठी गोव्यासारखी दुसरे ठिकाण नाही. समुद्रकिनारे, रॉक, सनबाथ यासाठी गोवा प्रसिद्ध आहेच. त्यासोबतच आता कॅसिनोही सर्वांचे आकर्षण बनले आहे. कॅसिनोमुळे गोव्याला दरवर्षी ३६८ कोटी रुपयांचा शुल्क मिळते. मांडवी नदीत तरंगते सहा कॅसिनो आहेत, तर तारांकित हॉटेलमध्ये ११ कॅसिनो आहेत. कॅसिनो व्यवसाय आता गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग बनला आहे. हिवाळ्यात चार्टर्ड विमानातून येणाऱ्या पर्यटकांकडे गोव्याचे अधिक लक्ष आहे.

युरोपीय देशांकडून सीनियर सिटीझन टूर

युरोपातील काही देशात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात बर्फ पडतो. त्यामुळे तेथील वयस्कर नागरिकांना आरोग्याची समस्या होते. अशा वयस्कर नागरिकांना त्यांचे सरकार लाखो रुपयांचे पॅकेज देते. त्यांनी तीन महिने देशाबाहेर जाऊन राहायचे व मार्च महिन्यात थंडी कमी झाली की परत यायचे. या सीनियर सिटीझनचे टूर आयोजन करणारे एजंटही आहेत. या एजंटांनी यंदा श्रीलंका, थायलंड, बैंकॉक पेक्षा गोव्याला पहिली पसंती दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button